CoronaVirus News: Now the corona is beginning to change form; Expert doctors made a big revelation mac | CoronaVirus News: दिलासादायक! आता कोरोना रुप बदलतोय, वैज्ञानिकांनी केला मोठा खुलासा

CoronaVirus News: दिलासादायक! आता कोरोना रुप बदलतोय, वैज्ञानिकांनी केला मोठा खुलासा

नवी दिल्ली: चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूनं जगभरात थैमान घातलं आहे. चीननं कोरोना संकट नियंत्रणात आणलं असलं, तरी अद्याप अनेक देशांना कोरोनावर नियंत्रण मिळवता आलेलं नाही. कोरोनावर मात करणयासाठी सर्व देशांतील सरकारकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहे. 

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरत आतापर्यत एकूण 6,185,076 जणांना कोरोनाची लागण झाली असून 371,398 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच  भारतातही कोरोना बाधितांची संख्या सातत्यानं वाढत आहे. जगाचा विचार केल्यास भारत सध्या सातव्या स्थानावर आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या १ लाख ९० हजारांच्या पुढे आहे. तर मृतांचा आकडा साडे पाच हजारांच्या आसपास आहे.

कोरोना व्हायरसचे अनेक रुप आहे, असा दावा याआधी देखील जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनी केला होता. तसेच आता इटलीतील एका तज्ज्ञ डॉक्टरांनीही कोरोनाने आतापर्यत स्वत:मध्ये अनेक बदल केले असून आतादेखील हा विषाणू आपलं रूप बदलू लागला आहे असा दावा केला आहे.

इटलीतील डॉ. अलबर्टो झॅन्ग्रिलो यांनी सांगितलं की, कोरोना व्हायरस आता आपली क्षमता गमावत असून तो कमी प्राणघातक होतो आहे. गेल्या 10 दिवसात जे स्वॅब टेस्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोरोना व्हायरसची क्षमत कमजोर पडत असल्याचे दिसून आले आहे, असा खुलासा अलबर्टो झॅन्ग्रिलो यांनी केला आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: Now the corona is beginning to change form; Expert doctors made a big revelation mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.