शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : चीन अन् इटलीच्या तुलनेत भारतातून येणारा कोरोना 'प्राणघातक', नेपाळच्या PMची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 08:44 IST

बाहेरून लोक येत असल्यामुळे नेपाळमध्ये या विषाणूची लागण थांबविणे फार कठीण झाले आहे.

ठळक मुद्देचीन आणि इटलीच्या तुलनेत भारताकडून येणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक "प्राणघातक" आहे.भारतातून नेपाळमध्ये बेकायदेशीररीत्या प्रवेश करणाऱ्या लोकांमुळेच नेपाळमध्ये कोरोना संक्रमितांचं प्रमाण वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला. बाहेरून लोक येत असल्यामुळे नेपाळमध्ये या विषाणूची लागण थांबविणे फार कठीण झाले आहे.

काठमांडूः चीन आणि इटलीच्या तुलनेत भारताकडून येणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक "प्राणघातक" आहे, असं धक्कादायक विधान नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी केलं आहे. भारतातून नेपाळमध्ये बेकायदेशीररीत्या प्रवेश करणाऱ्या लोकांमुळेच नेपाळमध्ये कोरोना संक्रमितांचं प्रमाण वाढत असल्याचा आरोपही त्यांनी केला. नेपाळमध्ये आतापर्यंत कोरोनाबाधित ४२७ रुग्ण समोर आले आहेत. ओलींनी मंगळवारी संसदेत सांगितले की, बाहेरून लोक येत असल्यामुळे नेपाळमध्ये या विषाणूची लागण थांबविणे फार कठीण झाले आहे. ते म्हणाले, "कोरोना विषाणूचे बरेच रुग्ण नेपाळमध्ये दाखल झाले आहेत. हा विषाणू बाहेरून आला आहे, आमच्याकडे तो नव्हता. आम्ही सीमेपलीकडून येणाऱ्या लोकांची घुसखोरी रोखू शकलो नाही. "कोरोना विषाणूचे वाढते प्रमाण हे आज देशासमोर असलेले सर्वात मोठे आव्हान आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात लॉकडाऊनचं उल्लंघन करत अनेक भारतातल्या लोकांनी नेपाळमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळेच नेपाळमध्ये कोरोनाग्रस्तांचं प्रमाण वाढल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच भारतातून येणारा कोरोना व्हायरसचा संसर्ग चीन आणि इटलीपेक्षा जास्त घातक आहे, अशी टीकाही त्यांनी केली. काठमांडू पोस्ट यांनी ओलींच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. काही स्थानिक प्रतिनिधी आणि पक्षनेते योग्य तपास न करता भारतातून नेपाळमध्ये आणत आहे. नेपाळमध्ये कोरोना पसरण्यासाठी तेच लोक जबाबदार असल्याचं ओली म्हणाले आहेत. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी नेपाळ सरकार खबरदारीचा उपाय घेत असून, देशाला कोरोनापासून मुक्त करणं यालाच आमचं प्राधान्य असल्याचं ओली म्हणाले आहेत.  आतापर्यंत देशात कोरोनानं दोन लोकांचा मृत्यू झाला आहे.तत्पूर्वी भारत सरकारनं विरोध केल्यानंतरही नेपाळ सरकारनं नवा राजकीय आणि प्रशासकीय नकाशा प्रसिद्ध केला. या नकाशातून नेपाळनं लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरामधल्या एकूण ३९५ चौरस किलोमीटरच्या प्रदेशावर दावा सांगितला आहे. हा संपूर्ण भाग भारतीय हद्दीत येतो. नेपाळच्या भू व्यवस्थापन आणि सुधारणा मंत्री पद्मा अरयाल यांनी सरकारच्या वतीनं नवा नकाशा प्रसिद्ध केला. नवा नकाशा प्रसिद्ध करुन लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुराला आपल्या भागात दाखवू, अशी घोषणा नेपाळ सरकारनं आधी केली होती. त्यानंतर आज नेपाळनं नवा नकाशा जारी केला. आता सर्व सरकारी कार्यालयं आणि शाळांमध्ये या नकाशाचा वापर केला जाईल. नवा नकाशा लवकरच संसदेसमोर ठेवला जाईल आणि त्याला मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती अरयाल यांनी दिली. 

हेही वाचा

CoronaVirus News : कोरोनानं 90 हजार लोकांचा मृत्यू झाल्यानंतर ट्रम्प म्हणाले, हा तर 'बॅज ऑफ ऑनर'

Coronavirus: अहो आश्चर्यम्! फक्त दोन वेदनाशामक औषधं घेऊन रुग्ण झाले ठणठणीत, प्रशासनही आश्चर्यचकीत

CoronaVirus: लसीशिवाय 'या' नव्या औषधानं ठीकठाक होतायत कोरोनाचे रुग्ण; चीनच्या प्रयोगशाळेचा दावा

CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या