CoronaVirus: लसीशिवाय 'या' नव्या औषधानं ठीकठाक होतायत कोरोनाचे रुग्ण; चीनच्या प्रयोगशाळेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 01:58 PM2020-05-19T13:58:56+5:302020-05-19T14:27:52+5:30

CoronaVirus: चीनमधल्या वुहानमध्ये केंद्रबिंदू असलेल्या कोरोनाला थोपवण्यात अमेरिका, रशियासारख्या महासत्तांनाही अपयश आलं आहे.

संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात 3 लाखांहून अधिक लोकांनी प्राण गमावले आहेत. वेगवेगळे देश कोरोना व्हायरसवर लस शोधत आहेत.

चीनमधल्या वुहानमध्ये केंद्रबिंदू असलेल्या कोरोनाला थोपवण्यात अमेरिका, रशियासारख्या महासत्तांनाही अपयश आलं आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव अनेक देशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दरम्यान, चीनमधील एका प्रयोगशाळेने कोरोनावर एक औषध विकसित केल्याचा दावा केला आहे.

या औषधामध्ये कोरोना साथीच्या रोगाला रोखण्याची शक्ती आहे, असाही दावाही या प्रयोगशाळेतील वैज्ञानिकांनी केला आहे. तसेच लसीशिवाय कोरोनावर उपचार केले जाऊ शकतात, असाही दावा त्यांनी केला आहे.

चीनच्या प्रतिष्ठित पेकिंग युनिव्हर्सिटीमधील शास्त्रज्ञांकडून सध्या या औषधाची चाचणी घेण्यात येत आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, हे औषध कोरोना संक्रमित लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि त्यांना या आजारातून मुक्त करण्यास मदत करू शकते.

बीजिंग ऍडव्हान्स इनोव्हेशन सेंटर फॉर जिओनॉमिक्स विद्यापीठ विभागाचे संचालक सन्ने झी यांनी एएफपीला सांगितले की, प्राण्यांवर या औषधांची चाचणी यशस्वी झाली आहे.

ते म्हणाले, “जेव्हा आम्ही संक्रमित उंदरांच्या शरीरात अँटीबॉडी इंजेक्शन टोचले, तेव्हा पाच दिवसांनंतर विषाणूचा प्रभाव 2500 पर्यंत कमी झाला होता.

याचा अर्थ असा की, संभाव्य औषध हे कोरोनाबाधितांवर रामबाण ठरू शकते. कारण उंदरांवर त्याचा सकारात्मक परिणाम झाला आहे.

हे औषध विषाणूची लागण होण्यापासून पेशींचे संरक्षण करते, तसेच मनुष्यातील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करणाऱ्या विषाणूंना रोखते.

रविवारी सायंटिफिक जर्नल सेलमध्ये प्रकाशित केलेल्या पथकाने केलेल्या संशोधनात असे सुचवले आहे की, अँटीबॉडीजचा वापर केल्याने हा रोग बरा होतो.

तसेच रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. झी म्हणाले की, त्यांच्या पथकाने हे अँटीबॉडी शोधण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेतली आहे.

कोरोना व्हायरसने आतापर्यंत जगभरात 48 लाख लोकांना संक्रमित केले असून, यापैकी 3,15,000पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत.