शहरं
Join us  
Trending Stories
1
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
2
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
3
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
4
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
5
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
6
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
7
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
8
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
9
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
10
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
11
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
12
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
13
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
14
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
15
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
16
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
18
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
19
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
20
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा

CoronaVirus News: चिंता वाढली! सध्या कोरोनावरील व्हॅक्सीन तयार होऊ शकणार नाही, WHOचे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 9:55 PM

सध्या जगाच्या काना कोपऱ्यातून बातम्या येत आहेत, की कोरोनावरील व्हॅक्सीन ह्यूमन ट्रायलसाठी तयार आहे. असे असतानाच, डब्ल्यूएचओचे कोरोना व्हायरस स्पेशल एनव्हॉय टीमचे डॉक्टर डेव्हिड नेबॅरो यांनी सांगितले, की "कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीन तयार झाली आहे, असे सांगणाऱ्या गोष्टींवर आणि दाव्यांवर आपण विश्वास ठेवायला नको."

ठळक मुद्देकोरोना व्हायरसवर सध्या कुठल्याही प्रकारची व्हॅक्सीन तयार होणार नाही.कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीन तयार झाली आहे, असे सांगणाऱ्या गोष्टींवर आणि दाव्यांवर आपण विश्वास ठेवायला नको.आपल्याला आपल्या सवयीत सुधारणा करावी लागेल. तरच आपण याच्यापासून स्वतःला वाचवू शकतो.

वॉशिंग्टन : आपण कधी विचार केला होता का, की संपूर्ण जग मास्क वापरेल, सर्वजण एकमेकांपासून दोन मिटर अंतरावर राहतील, हे केवळ कोरोना काळामुळेच झाले आहे. अशात सर्वांच्या नजरा कोरोनावरील औषधाकडेच लागलेल्या आहेत. अनेक वैज्ञानिकही सांगत आहेत, की त्यांनी कोरोना व्हॅक्सीन तयार केली आहे. केवळ मानवावर चाचणी होणेच बाकी आहे. असे असतानाच, डब्ल्यूएचओच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचे, असे वक्तव्य आले आहे, जे सर्वांनाच निराश करू शकते. त्यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, की कोरोना व्हायरसवर सध्या कुठल्याही प्रकारची व्हॅक्सीन तयार होणार नाही. 

चीनची भीती! 'या'मुळे आता संपूर्ण जग देतंय भारताच्या पावलावर पाऊल, 'अशी' आखतंय रणनीती

सध्या जगाच्या काना कोपऱ्यातून बातम्या येत आहेत, की कोरोनावरील व्हॅक्सीन ह्यूमन ट्रायलसाठी तयार आहे. असे असतानाच, डब्ल्यूएचओचे कोरोना व्हायरस स्पेशल एनव्हॉय टीमचे डॉक्टर डेव्हिड नेबॅरो यांनी सांगितले, की "कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीन तयार झाली आहे, असे सांगणाऱ्या गोष्टींवर आणि दाव्यांवर आपण विश्वास ठेवायला नको."

नवा नकाशा जारी केल्यानंतर नेपाळच्या पंतप्रधानांचा भारतावर निशाणा, 'या' भागांवर सांगतायत दावा!

डॉक्टर डेव्हिड म्हणाले, कोरोना व्हायरसवरील वॅक्सीन तयार झाल्यानंतर, ती काही महिन्यांतच संपूर्ण जगातील लोकांवर योग्य पद्धतीने काम करेल आणि रुग्णांचा संसर्गापासून बचाव करेल, हे सध्या शक्यही नाही. इतरही काही व्हायरस आहेत ज्याची नेहमीच भीती आहे. जसे, एचआयव्ही एड्स. आपल्याला आपल्या सवयीत सुधारणा करावी लागेल. तरच आपण याच्यापासून स्वतःला वाचवू शकतो."

CoronaVirus News: WHOमध्ये भारताला मोठे पद; चीनवर निशाणा, भारतावर सर्वांच्या नजरा

यावेळी डॉक्टर डेव्हिड यांनी, अशी आशाही व्यक्त केली की, कोरोना व्हायरसवरील व्हॅक्सीन तयारही होऊ शकते. मात्र, त्याला अद्याप फार वेळ लागेल. सध्या सुरू असलेले प्रयत्न पाहता, हे बऱ्याच प्रमाणावर अश्यक्य वाटते, की कोरोना व्हायरसची कुठलीही व्हॅक्सीन जगातील सर्व लोकांवर यशस्वीपणे कार्य करण्यास सक्षण ठरेल, असेही डेव्हिड म्हणाले. 

'ति'ने माझ्यावर 10 वर्ष 'बलात्कार' केला, युवकाने सांगितली अत्याचाराची कहाणी

आयर्लंडमधील डिपार्टमेन्ट ऑफ हेल्थचे उपमुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रोनन ग्लिन यांनीही, अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, "आपल्याला दिर्घकाळ कोरोना व्हायरस सोबतच जगावे लागणार आहे. हे केव्हापर्यंत चालेल हे सांगणे अवघड आहे."

CoronaVirus News : आनंदाची बातमी! : कोरोनावरील औषध सापडलं; 'ही' अँटीबॉडी 100 टक्के गुणकारी, अमेरिकन कंपनीचा दावा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाdoctorडॉक्टरMedicalवैद्यकीयAmericaअमेरिकाUSअमेरिका