CoronaVirus News : 'या' अवयवांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, पोस्टमॉर्टममधून धडकी भरवणारा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 01:31 PM2020-08-26T13:31:02+5:302020-08-26T13:33:52+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात येत आहे.

CoronaVirus Marathi News corona causing damage to human organs says research | CoronaVirus News : 'या' अवयवांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, पोस्टमॉर्टममधून धडकी भरवणारा खुलासा

CoronaVirus News : 'या' अवयवांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, पोस्टमॉर्टममधून धडकी भरवणारा खुलासा

Next

कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दोन कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात येत आहे. संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यान कोरोना व्हायरस शरीरातील कोणकोणत्या अवयवांना नुकसान पोहोचवतो याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका रिसर्चमधून धडकी भरवणारा खुलासा करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, द लँसेट मायक्रोबमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये कोरोना व्हायरासमुळे ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या फुफ्फुस आणि किडनीला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली असल्याची माहिती देण्यात आली आहे. इंग्लंडमधील कोरोना रुग्णांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टचा अभ्यास करण्यात आला आहे. इंपीरिअल कॉलेज लंडन आणि इंपीरिअल कॉलेज हेल्थकर एनएनचएस ट्रस्टने हा रिसर्च केला आहे.

रिसर्चनुसार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या दहा पैकी नऊ रुग्णांना हृदय, किडनी आणि फुफ्फुसामध्ये थ्रोम्बोसिस म्हणजे रक्ताच्या गुठळ्या सापडल्या आहेत. या रिसर्चमधील डॉ. मायकल ऑस्बर्न यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस फुफ्फुसांना पूर्णपणे नष्ट करतो ज्यामुळे रुग्णाचा मृत्यू होता. इंपीरिअल कॉलेज एनएचएस ट्रस्टच्या रुग्णालयात  22 ते 97 वयोगटातील कोरोना रुग्णांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टचा अभ्यास करण्यात आला. 

कोरोना रुग्णांच्या किडनीचं कोरोनामुळे नुकसान होतं आणि आतड्यांना सूज आल्याची माहिती रिसर्चमधून समोर आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जगभरात रुग्णांची एकूण संख्या 24,058,354 आहे. कोरोनामुळे आतापर्यंत आठ लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 823,510 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16,608,018 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात असताना दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

माणुसकीला काळीमा! दंड न भरल्याने पंचांनीच केला महिलेवर सामूहिक बलात्कार

काय सांगता? जगातील सर्वात स्वस्त मोबाईल डेटा भारतात; तर 'या' देशात आहे सर्वात महाग

मेड इन चायनाचा 'या' देशाला बसला मोठा फटका; 3700 निरोगी लोकांना दाखवलं 'कोरोना पॉझिटिव्ह'

CoronaVirus News : देशात कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागे 'हे' आहे कारण, ICMR ने दिला गंभीर इशारा

Mahad Building Collapse: 'इमारत असो वा समाज, पाया हा मजबूतच हवाच'; सुबोध भावेचं सूचक ट्विट 

Web Title: CoronaVirus Marathi News corona causing damage to human organs says research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.