CoronaVirus Marathi News 50000 new coronavirus cases found in one day in america | धक्कादायक!: 'या' देशाने कालच साजरा केला स्वातंत्र्य दिन, नंतर एका दिवसात आढळले 50,000वर कोरोनाबाधित 

धक्कादायक!: 'या' देशाने कालच साजरा केला स्वातंत्र्य दिन, नंतर एका दिवसात आढळले 50,000वर कोरोनाबाधित 

ठळक मुद्देजगाचा विचार करता आतापर्यंत तब्बल 5.30 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.आतापर्यंत जगातील 188 देशांत एकूण 1.12 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.आतापर्यंत जगभरातील एकूण 60 लाख 44 हजार 414 लोक पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.

बाल्‍टीमोर - गेल्या चार दिवसांपासून अमेरिकतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. येथील नव्या कोरोना संक्रमितांच्या आकड्याने आता 50,000 हजारचा आकडा ओलांडला आहे. येथील तज्ज्ञांनी 4 जुलैच्या अमेरिकन स्‍वातंत्र दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांसंदर्भात इशाराही दिला होता. या उत्सवानंतर अमेरिकेतील कोरोना संक्रमितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

कोरोना महामारीमुळे अमेरिका आणि ब्राझीलची परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. अमेरिकेतील संक्रमितांची एकूण संख्या आता 28 लाख 39 हजारच्याही पुढे गेली आहे. तर आतापर्यंत 1 लाख 29 हजार लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. महामारीच्या पार्श्वभूमीवर आता फ्लोरिडातील सर्वाधिक लोकवस्ती असलेल्या मियामी शहरात कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, ब्राझीलमध्ये एका दिवसात तब्बल 38 हजार कोरोनाबाधित समोर आले आहेत. याच काळात येथे एक हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झला आहे. ब्राझिलमधील कोरोना संक्रमितांचा आकडा आता 15 लाख 77 हजारांवर पोहोचला आहे. तर 64 हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे जगभरातील मरणारांचा आकडा सातत्याने  वाढतच चालला आहे. जगाचा विचार करता आतापर्यंत तब्बल 5.30 लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर, 188 देशांत एकूण 1.12 कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिका आणि ब्राझिलमध्येच झाले आहेत. जॉन्स हॉपकिंस विद्यापीठाच्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत जगभरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1 कोटी 12 लाख 39 हजार 378 एवढी होती. तर यापैकी तब्बल 5 लाख 30 हजार 110 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 60 लाख 44 हजार 414 लोक पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांच्या प्रेयसीला कोरोनाची लागण  - 
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा मुलगा, डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांच्या प्रेयसीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. किम्बरली गुइलफॉय, असे त्याच्या प्रेयसीचे नाव आहे. यासंदर्भात एका अमेरिकन माध्यमाने शुक्रवारी माहिती दिली. गुइलफॉय यांनी माउंट रशमोर येथील अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या चौथ्या भाषणाचा आणि सेलिब्रेशनच्या आतिशबाजीचा आढावा घेण्यासाठी दक्षिण डकोटाचा प्रवास केला होता. गुइलफॉय ट्रम्प कॅम्पेनमधील एक वरिष्ठ अधिकारी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या -

Photo : डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांच्या गर्लफ्रेंडला Corona, अशी आहे ग्लॅमरस

CoronaVirus : धक्कादायक! कोरोनाचं नव रूप आलं समोर, अधिक वेगानं लोकांना करतोय संक्रमित; पण...

चीन सीमेवर तणाव वाढतोय, पंतप्रधान मोदींनी घेतली राष्‍ट्रपतींची भेट; अर्धातास चालली चर्चा

मोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान

...पण, पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्यासाठी लेहपासून 25KM दूर असलेले 'न्योमा'च का निवडले?

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News 50000 new coronavirus cases found in one day in america

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.