शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

Coronavirus: ...तर ‘तियानमेन चौका’सारखी परिस्थिती उद्भवेल अन् चीन-अमेरिकेमध्ये होईल सैन्य 'युद्ध'; रिपोर्टमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 10:18 AM

आता चीनचा एक अंतर्गत अहवाल समोर आला असून, चीनविरोधात दिवसेंदिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर रोष वाढत असल्याचं सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देचीनचा एक अंतर्गत अहवाल समोर आला असून, चीनविरोधात दिवसेंदिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर रोष वाढत असल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या प्रसारामुळे चीन संपूर्ण जगाच्या नजरेत आला असून, अमेरिका आणि चीनमध्ये असलेली कटुतेचं कधीही युद्धात रुपांतर होऊ शकतं, असा इशाराही रॉयटर्सनं दिला आहे. चिनी संरक्षण मंत्रालयाने हा अहवाल गेल्या महिन्यात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह बीजिंगमधील सर्वोच्च नेत्यांना सादर केला होता.

बीजिंग: कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, त्याचं उगमस्थान चीनमधील वुहान शहर असल्याचं  वारंवार अमेरिकेकडून सांगितलं जात आहे. कोरोनाचा रशिया, अमेरिकासारख्या बलाढ्य देशांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. तर इटली, स्पेन सारखे देशही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनविरोधात कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यातच आता चीनचा एक अंतर्गत अहवाल समोर आला असून, चीनविरोधात दिवसेंदिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर रोष वाढत असल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या प्रसारामुळे चीन संपूर्ण जगाच्या नजरेत आला असून, अमेरिका आणि चीनमध्ये असलेल्या कटुतेचं कधीही युद्धात रुपांतर होऊ शकतं, असा इशाराही अहवालाच्या हवाल्यानं रॉयटर्सनं दिला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, चिनी संरक्षण मंत्रालयाने हा अहवाल गेल्या महिन्यात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह बीजिंगमधील सर्वोच्च नेत्यांना सादर केला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर चिनी लोकांविरोधात प्रचंड संताप आहे. चीनविरुद्ध 1989च्या तियानमेन चौकसारखं वातावरण निर्माण झालं आहे. चीन विरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर रोष वाढताचतज्ज्ञांनी असे सूचित केले आहे की, या महारोगराईनंतर चीनला वाईट परिस्थितीतून जावे लागेल. अमेरिकेच्या पाठीशी असलेल्या देशांचा चीनविरोधातील राग शिगेला पोहोचेल आणि हे प्रकरण थेट युद्धापर्यंत जाऊ शकते. येत्या काही दिवसांत चीन आणि अमेरिका यांच्यातील तणाव आणखी शिगेला जाईल, असंही या अहवालात म्हटले आहे. चीनच्या समकालीन आंतरराष्ट्रीय संबंध संस्थेने हा (सीआयसीआयआर) अहवाल तयार केला आहे. सीआयसीआयआर ही चीनच्या अव्वल इंटेलिजन्स संस्था आहे. तियानमेन चौक प्रकरणामुळे चीनला आर्थिक निर्बंधांचा करावा लागला सामना सीआयसीआयआर हा 1980 पासून चीनचा प्रमुख थिंकटँक आहे. ही संस्था संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येते आणि चिनी सरकारला परदेशी व संरक्षणविषयक बाबींचा सल्ला देत असते. याबाबत सीआयसीआयआरकडून अद्याप यासंदर्भात कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.या अहवालावर चीन गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. चीन आपले आंतरराष्ट्रीय संबंध आणि संरक्षण प्रकरणावरून बचावात्मक पवित्र्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध बिघडल्याचे समोर आले. कोरोना विषाणूवरून चीनवर केलेल्या अमेरिकेच्या आरोपांमुळे चीनचे स्थान कमकुवत झाले आहे. विशेषत: आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोना विषाणूमुळे चीन कुप्रसिद्ध झाला आहे. चीनविरोधी भावना वाढल्यामुळे बेल्ट अँड रोड इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्टवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अमेरिका आपल्या स्थानिक मित्रांना आर्थिक आणि लष्करी पाठबळ देऊन चीनला आव्हान देऊ शकते. संपूर्ण दक्षिण आशियासाठी हे धोकादायक ठरेल, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 

काय आहे तियानमेन चौक प्रकरण?जवळपास 30 वर्षांपूर्वी चीनच्या तियानमेन चौकात नरसंहार झाला होता. चीनच्या क्रूरतेने 1989मध्ये कळस गाठला होता. हा दिवस चीनच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून ओळखला जातो. 4 जून 1989 मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उदारमतवादी नेता हू याओबँग यांच्या कथित हत्येविरोधात हजारो विद्यार्थी बीजिंगच्या तियानमेन चौकात आंदोलन करत होते. असे म्हणतात की, 3 आणि 4 जूनमधील रात्री लोकशाहीच्या समर्थकांवर चीनच्या कम्युनिस्ट सरकारने एवढे अत्याचार केले की चीनसाठी हा काळा अध्याय ठरला आहे. चीनच्या सेनेने निर्दोष लोकांवर गोळ्या झाडल्या तसेच त्यांच्यावर रणगाडे चालविले आणि त्यांना चिरडून ठार केले. यात शेकडो लोक मारले गेले, तर ब्रिटिश गुप्तहेर खात्यानुसार या नरसंहारात 10 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. जगभरात या तियानमेन चौक हत्याकांडावरून टीका होत असताना चीनने ही कारवाई योग्यच असल्याचे म्हटले होते. चीनचे तत्कालीन संरक्षण मंत्र्यांनी सरकारची ही योग्य नीती असल्याचे म्हटले होते. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus: कौतुकास्पद! कर्तव्य बजावतानाच पोलिसानं रस्त्यावर उघडली शाळा अन् मुलांना देतोय शिक्षणाचे धडे

Coronavirus: दारू महागली! 'या' राज्यात मद्यावर ७० टक्के अतिरिक्त कर लागणार

राज्यात कोरोनाचे १४ हजार ५४१ रुग्ण; मुंबईतील बाधितांची संख्या ९,३१०

CoronaVirus: धक्कादायक! कोरोनाची रहस्यमय माहिती असलेली चीनमधील प्रसिद्ध 'बॅट वुमन' अचानक गायब

फेसबुकनंतर जिओचा आणखी एक मोठा करार; अमेरिकेच्या 'या' कंपनीसोबत मिळवला हात

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प