Coronavirus: दारू महागली! 'या' राज्यात मद्यावर ७० टक्के अतिरिक्त कर लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 07:46 AM2020-05-05T07:46:45+5:302020-05-05T08:02:04+5:30

सरकारच्या या निर्णयामुळे कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्येच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या महसुलाला चालना मिळणार आहे.

Coronavirus: delhi government will charge 70 percent extra tax on liquor from tuesday vrd | Coronavirus: दारू महागली! 'या' राज्यात मद्यावर ७० टक्के अतिरिक्त कर लागणार

Coronavirus: दारू महागली! 'या' राज्यात मद्यावर ७० टक्के अतिरिक्त कर लागणार

Next
ठळक मुद्देसोमवारपासून अनेक राज्यांमध्ये दारूची दुकानं उघडल्यामुळे मद्यप्रेमींच्या दुकानाबाहेर लांबच लांब रांग लागल्याचं पाहायला मिळालं. दारूच्या दुकानाबाहेर सामाजिक अंतराचे नियम लोकांनी धाब्यावर बसवल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने सोमवारी अहवाल तयार केला आणि दुकानांमध्ये जास्त गर्दी होऊ नये म्हणून दारू विक्रीची वेळ वाढवण्याचा प्रस्ताव दिला. दिल्ली सरकारने मंगळवारपासून दारू विक्रीवर 70 टक्के कोरोना महारोगराई कर लादण्याचा निर्णय घेतला असून, त्याला 'स्पेशल कोरोना फी' असे नाव देण्यात आले आहे.

नवी दिल्लीः सोमवारपासून अनेक राज्यांमध्ये दारूची दुकानं उघडल्यामुळे मद्यप्रेमींच्या दुकानाबाहेर लांबच लांब रांग लागल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी सोशल डिन्स्टसिंगचे तीनतेरा वाजलेले दिसले. दारूच्या दुकानाबाहेर सामाजिक अंतराचे नियम लोकांनी धाब्यावर बसवल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने सोमवारी अहवाल तयार केला आणि दुकानांमध्ये जास्त गर्दी होऊ नये म्हणून दारू विक्रीची वेळ वाढवण्याचा प्रस्ताव दिला. राजधानी दिल्लीत ४० दिवसांहून अधिक काळानंतर सोमवारी मद्याची दुकाने उघडली गेली आणि दुकानाबाहेर लोक सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करीत नसल्यामुळे अनेक दुकानं बंद करावी लागली. त्यामुळेच दिल्ली सरकारनेही मद्यावर अतिरिक्त 70 टक्के कोरोना महारोगराई कर लादण्याचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून करण्यात येणार आहे.

स्पेशल ब्रँचनं सांगितलं असं काही
विशेष शाखेच्या अहवालात असे म्हटले आहे की, जास्त गर्दी टाळण्यासाठी दारू विक्रीची वेळ वाढवता येऊ शकते आणि दुकानांमध्ये दारूचा पुरेसा साठा उपलब्ध झाला पाहिजे. कारण लोक त्यांच्या गरजेपेक्षा जास्त मद्य खरेदी करणार आहेत, यासाठी विशेष शाखेने कित्येक मुद्दे एकत्र तयार करून तो अहवाल दिल्ली सरकारला सुपूर्द केला आहे.

मंगळवारपासून सरकार करणार हे काम
दिल्ली सरकारने मंगळवारपासून दारू विक्रीवर 70 टक्के कोरोना महारोगराई कर लादण्याचा निर्णय घेतला असून, त्याला 'स्पेशल कोरोना फी' असे नाव देण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्येच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या महसुलाला चालना मिळणार आहे. हा नियम मंगळवार सकाळपासून लागू झाला असून, मद्यपान करणार्‍यांना आता अधिक पैसे मोजावे लागतील हेसुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल यांचा मद्यप्रेमींना इशारा
सीएम केजरीवाल म्हणाले की, केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानंतर दिल्ली रेड झोनमध्ये असताना आम्ही काही अटींसह दारूविक्रीला सूट दिली होती, परंतु काही ठिकाणी सामाजिक अंतर न पाळता त्याची थट्टा केली गेली आहे. ते आम्हाला कधीच मान्य होणार नाही. पुन्हा असा प्रकार आढळून आल्यास संबंधित भाग सील करू, असा इशाराच केजरीवालांनी दिला आहे. आर्थिक कामकाजादरम्यान दुकानदारांनाही आपली जबाबदारी समजून घ्यावी लागेल. काही लोकांमुळे आपण संपूर्ण दिल्लीला धोक्यात घालू शकत नाही. सोमवारी दारूच्या दुकानांबाहेर झालेल्या गोंधळानंतर केजरीवालांनी हा इशारा दिला आहे. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

राज्य सरकारचा मोठा निर्णय! यंदा नोकरभरती नाही; खर्चाला ६७% कात्री

६०० कोटींची उलाढाल लॉकडाऊनमुळे थंडावली; देशातील आर्थिक घडामोडी ठप्प

राज्यात कोरोनाचे १४ हजार ५४१ रुग्ण; मुंबईतील बाधितांची संख्या ९,३१०

CoronaVirus: धक्कादायक! कोरोनाची रहस्यमय माहिती असलेली चीनमधील प्रसिद्ध 'बॅट वुमन' अचानक गायब

फेसबुकनंतर जिओचा आणखी एक मोठा करार; अमेरिकेच्या 'या' कंपनीसोबत मिळवला हात

Web Title: Coronavirus: delhi government will charge 70 percent extra tax on liquor from tuesday vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.