शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
6
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
7
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
8
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
9
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
10
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
11
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
12
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
13
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
14
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
15
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
16
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
18
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
19
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
20
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : बापरे! 'या' देशात रस्त्यावरच पडले मृतदेह, 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 18:13 IST

Coronavirus : चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 69,768 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 69,768 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 12,74,022 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 2,64,833 लोक बरे झाले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 4000 वर पोहोचला आहे. तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला आहे. कोरोनाच्या भीतीने अंत्यसंस्कार करायलाच कोणी तयार नसल्याने रस्त्यावरच मृतदेह पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

लॅटिन अमेरिका खंडातील इक्वाडोरमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. इक्वाडोरच्या गुआयरिलमधील नागरिकांमध्ये कोरोनाची प्रचंड भीती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांचे मृतदेह रस्त्यावरच पडले असून ते उचलायला तसेच त्यावर अंत्यसंस्कार करायला कोणीच तयार नाही. कोरोनाच्या संसर्गामुळे इक्वाडोरमधील आरोग्य सेवेवरही विपरीत परिणाम झाला आहे. गुआयकिल शहरात सर्वाधिक लोकसंख्या आहे. या शहरातील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य सेवेवर परिणाम झाल्याची माहिती मिळत आहे. 

कोरोनाग्रस्तांसाठी देशातील रुग्णालयात बेडही नाहीत. तर दुसरीकडे मृतांची संख्या वाढल्याने शवागृह, स्मशानभूमीतही मृतदेह पडून आहेत. रस्त्याच्या एका बाजूला मृतदेह बेवारसपणे पडलेले आढळत आहेत. रस्त्यांवर मृतदेह पडून असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती देखील काही स्थानिकांनी व्यक्त केली आहे. मृतदेह ठेवण्यास जागा नसल्यामुळे अनेकजणांनी आपल्या घरांसमोरच मृतदेह ठेवले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

गुआयकिलमध्ये राहणाऱ्या फेरनांडो इस्पाना यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील पाच दिवसांपासून रस्त्यावर पडलेले मृतदेह कोणीतरी घेऊन जाईल याची आम्ही प्रतिक्षा करत आहोत. 911 क्रमांकावर याची तक्रार दिली. मात्र, प्रशासनाच्यावतीने कोणीही मृतदेह उचलण्यास आले नसल्याचे त्यांनी सांगितले. तर आम्ही आतापर्यंत 300 घरांतून मृतदेह उचलले आहेत. निधन झाल्यानंतर त्या रुग्णाचे कुटुंबीय मृतदेह रस्त्यावर आणून ठेवत आहेत. त्यानंतर काही तासानंतर हे मृतदेह उचलण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : 'आम्हाला पैशांची समस्या नाही तर...', केजरीवालांनी दिलं गौतम गंभीरला उत्तर

Coronavirus : कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये गर्भवती महिलेसाठी पोलीस ठरले देवदूत

Coronavirus : धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून पेंट वॉर्निश प्यायले अन्... 

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी सरकारचं 'आरोग्य सेतू' अ‍ॅप, 'त्या' व्यक्तींना करता येणार ट्रॅक

Coronavirus : प्रेरणादायी! ...म्हणून 6 महिन्यांच्या चिमुकलीला कुशीत घेऊन आई करतेय काम

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू