Coronavirus : 'कोरोना'चे तब्बल 2,07,906 बळी, जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 30 लाखांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 07:24 PM2020-04-27T19:24:04+5:302020-04-27T19:28:37+5:30

Coronavirus : जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत.

coronavirus confirmed cases covid 19 worldwide exceed 3,014,073 over 207,906 died SSS | Coronavirus : 'कोरोना'चे तब्बल 2,07,906 बळी, जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 30 लाखांवर

Coronavirus : 'कोरोना'चे तब्बल 2,07,906 बळी, जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 30 लाखांवर

Next

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 207,906 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 30 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 3,014,073 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 888,543 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. 

कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 55,415 बळी  घेतले आहेत. तसेच अमेरिकेमध्ये रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेसह इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेखालोखाल इटलीमध्ये 26 हजार, 644 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये मृतांचा आकडा 23 हजार 521 वर गेला आहे. फ्रान्समध्ये कोरोना व्हायरसमुळे 22 हजार, 856 जणांचा तर ब्रिटनमध्ये 20 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाच्या 1396 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर याच काळात 48 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 381 जणांनी कोरोनाला मात दिली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात एकूण 1396 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. 

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 27 हजार 892 पर्यंत पोहोचला आहे. तसेच दिवसभरात 48 जणांचा मृत्यू झाला असून, देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा 872 झाला आहेत. दिलासादायक बाब म्हणजे याच काळात 381 रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा 6 हजार 185 झाला आहे. त्यामुळे कोरोनाला मात देत बऱ्या झालेल्या रुग्णांची टक्केवारी 22.17 झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus : दिल्लीत डॉक्टर, नर्ससह तब्बल 170 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

Video : धक्कादायक! VIP ताफ्यासाठी पोलिसांनी थांबवली रुग्णवाहिका

Coronavirus : भारीच! फक्त चेहरा पाहून कोरोनाची माहिती मिळणार, 'हे' उपकरण फायदेशीर ठरणार

Coronavirus : 'मी जिवंत आहे', डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या रुग्णाचा धक्कादायक Video

Coronavirus : 'लॉकडाऊनमध्ये आमच्या शिक्षिका क्लास घेतात', 5 वर्षांच्या चिमुकल्याची थेट पोलिसांकडे तक्रार

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये WhatsApp ओपन न करता कोण, कधी ऑनलाईन आहे हे असं जाणून घ्या

 

Web Title: coronavirus confirmed cases covid 19 worldwide exceed 3,014,073 over 207,906 died SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.