Corona Virus: पुन्हा आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट COVID HV.1, ही लक्षणं दिसली तर वेळीच सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 04:08 PM2023-11-03T16:08:55+5:302023-11-03T16:09:22+5:30

Corona Virus New Variant: नुकताच अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट समोर आला आहे. अमेरिकेमध्ये कोविड-१९ चा HV.1 हा व्हेरिएंट सापडला आहे. हा व्हेरिएंट वेगाने फैलावत असल्याने चिंता वाढली आहे. 

Corona Virus: A new variant of Corona has come again, COVID HV.1, if you see these symptoms, be careful in time | Corona Virus: पुन्हा आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट COVID HV.1, ही लक्षणं दिसली तर वेळीच सावध व्हा

Corona Virus: पुन्हा आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट COVID HV.1, ही लक्षणं दिसली तर वेळीच सावध व्हा

जवळपास दोन वर्षे संपूर्ण जगाला भीतीच्या छायेखाली जगण्यास भाग पाडणारा आणि कोट्यवधी लोकांचा बळी घेणारा कोरोना विषाणू सध्या चर्चेतून गायब झाला आहे. मात्र कोरोनाचं नाव घेतलं तर आजही अनेकांच्या काळजात धडकी भरते. हा कोरोना विषाणू अद्याप संपूर्णपणे नष्ट झालेला नाही. नुकताच अमेरिकेमध्ये कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट समोर आला आहे. अमेरिकेमध्ये कोविड-१९ चा HV.1 हा व्हेरिएंट सापडला आहे. हा व्हेरिएंट वेगाने फैलावत असल्याने चिंता वाढली आहे. 

HV.1 हा व्हेरिएंट वेगाने पसरणारा विषाणू आहे. या व्हेरिएंटचा संसर्ग झाल्यानंतरची लक्षणं कोरोनाच्या अन्य व्हेरिएंटशी मिळती जुळती आहेत. डॉक्टरांच्या मते हा व्हेरिएंट इतर व्हेरिएंटशी बऱ्यापैकी मिळता जुळता आहे. त्यामुळे त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. 

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लक्षणं कोरोनाच्या इतर व्हेरिएंटशी मिळती जुळती आहेत. या व्हेरिएंटचा संसर्ग झाल्यास दिसणारी लक्षणं पुढीलप्रमाणे आहेत. यामध्ये अंगदुखी, गळ्यामध्ये खवखव, नाक बंद होणे, उलट्या, पोटदुखी, थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे, अशी लक्षणे आहेत. या व्हेरिएंटची काही लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. याची लक्षणं साधारण सर्दी खोकल्याशी मिळती जुळती आहेत. मात्र संसर्ग वेगवेगळ्या रुग्णांमध्ये वेगवेगळा असू शकतो. अशा परिस्थितीत तुम्हालाही ही लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडून तपासून घ्या.  

Web Title: Corona Virus: A new variant of Corona has come again, COVID HV.1, if you see these symptoms, be careful in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.