corona vaccine : कोरोनाविरोधात विकसित झाली स्वस्त आणि मस्त लस, सर्व प्रकारच्या कोरोना विषाणूंविरोधात ठरणार प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 02:55 PM2021-04-21T14:55:03+5:302021-04-21T15:01:41+5:30

corona vaccine update : कोरोनाविरोधात एक अशी लस विकसित करण्यात आली आहे जी नव्या आणि भविष्यात येऊ शकणाऱ्या अशा सर्व कोरोना विषाणूंविरोधात प्रभावी ठरू शकते.

corona vaccine: Cheap and Effective vaccine developed against coronavirus, effective against all types of corona viruses | corona vaccine : कोरोनाविरोधात विकसित झाली स्वस्त आणि मस्त लस, सर्व प्रकारच्या कोरोना विषाणूंविरोधात ठरणार प्रभावी

corona vaccine : कोरोनाविरोधात विकसित झाली स्वस्त आणि मस्त लस, सर्व प्रकारच्या कोरोना विषाणूंविरोधात ठरणार प्रभावी

Next

वॉशिंग्टन - गेल्या दीड वर्षापासून जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूविरोधात (coronavirus)  प्रभावी औषधोपचार आणि लस विकसित करण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. (corona vaccine update) याकाळात कोरोनाविरोधातील काही लसीही विकसित झाल्या आहेत. मात्र त्या अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, कोरोनाविरोधात एक अशी लस विकसित करण्यात आली आहे जी नव्या आणि भविष्यात येऊ शकणाऱ्या अशा सर्व कोरोना विषाणूंविरोधात प्रभावी ठरू शकते. तसेच या लसीची किंमत केवळ एक डॉलर असेल, अशी प्राथिमिक माहिती आहे. (Cheap and Effective vaccine developed against coronavirus, effective against all types of corona viruses)

एका प्रायोगिक कोरोना लसीच्या प्राण्यांवर केलेल्या प्राथमिक चाचणीमधून समाधानकारक माहिती समोर आली आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की, ही लस कोरोना विषाणूच्या सध्याच्या आणि भविष्यातील रूपांपासून बचाव करेल. युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियाच्या संशोधकांनी डुकरांना बाधित करणारा कोरोना विषाणू पोरकिन एपिडेमिक डायरिया व्हायरस (पीईडीव्ही) मॉडेलच्या माध्यमातून डुकरांना आजारी पडण्यापासून वाचवले आहे.   

पीईडीव्ही डुक्करांमध्ये संसर्ग  फैलावण्याचे काम करतो. त्यामुळे त्यांना जुलाब लागतात. त्यांना उलट्या होतात. तसेच ताप येतो. ही बाब वराहपालन करणाऱ्या जगभरातील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. दरम्यान, नव्याने विकसित झालेली लस ही कोरोना विषाणूविरोधात एकमेव लस विकसित करण्याचा मार्ग मोकळा करू शकते. यामध्ये त्या विषाणूंचा सुद्धा समावेश आहे ज्यामुळे याआधीही जागतिक साथीचा धोका निर्माण झाला होता. तसेच त्या कोरोना विषाणूंचाही समावेश आहे ज्यांच्यामुळे सर्दी खोकला होत असतो. 
 
संशोधकांच्या मते या लसीचे अनेक फायदे आहेत. जागतिक लसीकरण मोहिमेत येणारे अडथळे या लसीच्या माध्यमातून पार करता येतील. तसेच या लसींची साठवण आणि वाहतूक करणे सोपे असेल. एवढेच नाही तर जगातील दुर्गम भागातही ही लस पाठवता येईल. सध्या लस निर्मिती करत असलेल्या कारखान्यांचा वापर या लसीच्या निर्मितीसाठी करता येईल. 

Web Title: corona vaccine: Cheap and Effective vaccine developed against coronavirus, effective against all types of corona viruses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.