युरोपात कोरोनाचा कहर, पाच लाखहून अधिक जण संक्रमित, स्‍पेनमध्ये एकाच दिवसात 950 जणांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 11:40 PM2020-04-02T23:40:56+5:302020-04-02T23:55:43+5:30

कोरोना महामारीचा युरोपातील इटली, स्पेन, फ्रान्स आणि जर्मनीला सर्वाधिक फटका बसला आहे. याही देशांपैकी इटलीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. यानंतर कोरोनाने स्पेनचे सर्वाधिक नुकसान केले आहे. येथे मरणारांची संख्या दहा हजारांवर गेली आहे. या दोनच देशांत एक लाख हून अधिक कोरोनाग्रस्त आहेत.

corona outbreak in europ 950 deaths in spain in one day sna | युरोपात कोरोनाचा कहर, पाच लाखहून अधिक जण संक्रमित, स्‍पेनमध्ये एकाच दिवसात 950 जणांचा मृत्यू 

युरोपात कोरोनाचा कहर, पाच लाखहून अधिक जण संक्रमित, स्‍पेनमध्ये एकाच दिवसात 950 जणांचा मृत्यू 

googlenewsNext
ठळक मुद्देस्पेनमधील मृतांची संख्या 10,003 वर जगभरात कोरोनामुळे 46,906 जणांचा मृत्यू जगभरात 9,35,000 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण

माद्रिद  : कोरोनामुळे संपूर्ण युरोपात हाहकार माजला आहे. संपूर्ण जगाचा विचार करता कोरोनाचा संसर्ग झालेल्यांपैकी अर्धे लोक एकट्या युरोपातील आहेत. जगातील कोरोना बाधितांची संख्या लवकरच 10 लांखांवर जाऊन पोहोचणार आहे. मात्र यापैकी एकट्या युरोपातच पाच लाख लोक कोरोनाने त्रस्त आहेत. तेथे मरणारांचा आकडा तब्बल 35 हजारवर जाऊन पोहोचला आहे. 

कोरोना महामारीचा युरोपातील इटली, स्पेन, फ्रान्स आणि जर्मनीला सर्वाधिक फटका बसला आहे. याही देशांपैकी इटलीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. यानंतर कोरोनाने स्पेनचे सर्वाधिक नुकसान केले आहे. येथे मरणारांची संख्या दहा हजारांवर गेली आहे. या दोनच देशांत एक लाख हून अधिक कोरोनाग्रस्त आहेत.

स्‍पेनमध्ये एकाच दिवसात 950 जणांचा मृत्यू 
स्‍पेनमध्ये गेल्या 24 तासांत सर्वाधिक 950 जणांचा कोरोनाने जीव घेतला. आता तेथील मृतांची संख्या 10,003 वर पोहोचली आहे. येथे आतापर्यंत तब्बल 110,000 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. स्पेनच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील संक्रमाणाचा दर आता 8.3 टक्क्यांहून 7.9 टक्क्क्यांवर आला आहे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला हे प्रमाण 25 टक्के होते. स्पेनमध्ये सर्वाधिक फटका राजधानी माद्रिदला बसला आहे. येथे तब्बल चाह हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला तर 32 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

 जगभरात कोरोनामुळे 46,906 जणांचा मृत्यू -
जगभरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता 46,906 वर पोहोचला आहे. जगभरात 9,35,000 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.


ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर तपासणीची तयारी -
ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी एका व्हिडिओच्या मदतीने म्हटले आहे, की आम्ही देशात मोठ्या प्रमाणावर कोरोना टेस्ट करण्याची तयारी केली आहे. अशा पद्धतीने आम्ही त्याला हारवू. जॉनसन सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. ब्रिटेनमध्ये आतापर्यंत 33 हजारहून अधिक कोरोनाबाधीत सापडले आहेत. तर तीन हजारवर लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे.

आशियात चीननंतरइंडोनेशियात सर्वाधिक लोकांचा मृत्यू -
आशिया खंडात चीननंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका कुणाला बसला असेल तर तो इंडोनेशियाला. कोरोनामुळे  चीननंतर येथेच सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. येते आतापर्यंत 170 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर चीनमध्ये 3,300 हून अधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. इंडोनेशियामध्ये जवळपास 1800 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

सर्वाधिक मृत्यू आणि संसर्ग झालेले देश - 
देश           -       मृत्यू       -       संक्रमित
इटली         -    13,155      -      1,10,574
स्पेन           -    10,003    -      1,10,238
अमेरिका    -    5,113        -      2,15,362
फ्रांस          -    4,032       -       56,989
चीन           -     3,318       -        81,589
ईरान         -     3,160       -       50,468
ब्रिटेन        -     2921         -       33,718

 

Web Title: corona outbreak in europ 950 deaths in spain in one day sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.