शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
3
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
4
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
5
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
6
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
7
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
8
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
9
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
10
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
11
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
12
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
13
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
14
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
15
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
16
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
17
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
18
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
19
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
20
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

...पण ऐकतील ते ट्रम्प कसले?; 20 वर्षं चाललेल्या व्हिएतनाम युद्धापेक्षा जास्त अमेरिकींचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 6:51 PM

1955 ते 1975पर्यंत, असे तब्बल 20 वर्ष अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्यात युद्ध सुरू होते. मात्र तेव्हाही गेला नव्हता एवढ्या अमेरिकन नागरिकांचा बळी कोरोनाने अवघ्या 2-3 महिन्यात घेतला आहे...

ठळक मुद्देसीआयएने ट्रम्प यांना आधीच दिली होती कोरोना व्हायरस घातक असल्याची सूचनाडोनाल्ड ट्रम्प आपली चूक दुसऱ्याच्या माथी मारत असल्याचा आरोप चीनने केला आहेअमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणार आहे राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक

वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोना व्हायरसने आतापर्यंत 59 हजार 250हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. तर 10 लाख 35 हजारहून अधिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अमेरिकेतील मृतांचा हा आकडा 20 वर्ष चालेल्या व्हिएतनाम  युद्धात मारल्या गेलेल्या अमेरिकन सैनिकांपेक्षाही अधिक आहे. 1955 ते 1975पर्यंत चाललेल्या या व्हिएतनाम युद्धात अमेरिकेने आपले जवळपास 58 हजार सैनिक गमावले होते. 

अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरससंदर्भात 12 वेळा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, राष्ट्राध्यक्षडोनाल्ड ट्रम्प यांनी प्रत्येकवेळा त्याकडे दुर्लक्ष केले. आता कोरोनाने अमेरिकेला मगरमिठी मारली आहे.

चीननेही, डोनाल्ड ट्रम्प आपली चूक दुसऱ्याच्या माथी मारत असल्याचा आरोप केला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे, की अमेरिकेचे नेते खोटे बोलत आहेत. आपल्या जबाबदारीपासून वाचण्यासाठी दुसऱ्याला दोष देणे, एवढाच त्यांचा हेतू आहे.

ट्रम्प यांना आधीच दिली होती कोरोना व्हायरस घातक असल्याची सूचना -सीआयएच्या अधिकाऱ्यांनी वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या माहितीत म्हटले आहे, की राष्ट्राध्यक्षांना सूचना दिली होती, की चीनमध्ये पसरणारा कोरोना व्हायरस हा अत्यंत घातक आहे. चीन ही गोष्ट लपवत आहे. असे यापूर्वी कधीही बघितले गेलेले नाही. मात्र, ट्रम्प यांनी आमच्या सूचनेकडे पार दुर्लक्ष केले.

ट्रम्प म्हणतात...अमेरिकेतील परिस्थितीवर बोलताना ट्रम्प म्हणतात, जगातील देशांच्या तुलनेत आम्ही अधिक टेस्ट केल्या. यामुळे येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्णम समोर आले. आमचा आमच्या डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांवर पूर्ण विश्वास आहे. तसेच अनेक गोष्टींवर आम्ही मोठे निर्णय घेतले आहेत. जसे, तज्ज्ञांचा विरोध असतानाही, आम्ही देशाच्या सीमा बंद केल्या.

नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत निवडणुका -अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. आतापर्यंत 15 राज्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकी पूर्वी होणारी प्राथमीक निवडणूक टाळली आहे. यापैकी अनेकांनी ही निवडणूक जूनपर्यंत टाळली आहे. या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना मोठे नुकसान होऊ शकते, असेही बोलले जात आहे. ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केलेल्या कामांवर अनेक जण नाराज आहेत. अधिकांश तज्ज्ञांचे आणि डॉक्टरांचेही हेच मत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाUSअमेरिकाunited nationsसंयुक्त राष्ट्र संघchinaचीनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पPresidentराष्ट्राध्यक्ष