शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

वास्तव हेच, कोरोना : १,६६५ बळी, तर ६८,५०० लोकांना संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 6:34 AM

या विषाणूने ग्रस्त झालेले २००९ नवे रुग्ण शनिवारी आढळून आले आहेत.

बीजिंग : चीनमध्येकोरोना विषाणूच्या संसर्गाने बळी पडलेल्यांची संख्या १६६५वर पोहोचली असून या विषाणूची लागण झालेल्यांची एकूण संख्या ६८,५०० झाली आहे. त्या देशाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली.

या विषाणूने ग्रस्त झालेले २००९ नवे रुग्ण शनिवारी आढळून आले आहेत. चीनमध्ये शनिवारी १४२ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये हुबेई प्रांत व त्याची राजधानी वुहान येथील १३९ लोकांचा समावेश आहे. या साथीला आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू असून लवकरच त्याला यश येईल असा दावा चीनने केला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी उपचारानंतर बरे झालेल्या ९४१९ जणांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. त्या देशातील १७०० डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही साथ चीनमधून अन्य देशांतही पसरली आहे. तिच्यावर नियंत्रण आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने पाठविलेल्या वैद्यकीय पथकातील तज्ज्ञ चीनच्या डॉक्टरांना मदत करत आहेत.

‘ते’ ४०६ भारतीय कोरोनाग्रस्त नाहीतचीनच्या हुबेई प्रांताची राजधानी वुहानमधून भारतात परत आणलेल्या ४०६ भारतीय नागरिकांपैकी कोणालाही कोरोनाची लागण झाली नसल्याचे वैद्यकीय तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे या सर्वांना सोमवारपासून टप्प्याटप्प्याने घरी पाठविले जाणार आहे. चीनमधून विशेष विमानाने या सर्वांना दिल्लीला आणून आयटीबीपीच्या अख्यत्यारीतील क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले होते.१७५ नेपाळी नागरिक मायदेशीकोरोनाची साथ जिथून साºया जगभर पसरली त्या चीनच्या हुबेई प्रांतात अडकून पडलेल्या १७५ नेपाळी नागरिकांना वुहान येथून विशेष विमानाने रविवारी काठमांडूला आणण्यात आले.त्यामध्ये १७० नेपाळी विद्यार्थी, १ कर्मचारी, दोन पर्यटक, दोन लहान मुलांचा समावेश आहे. वुहानमधील नेपाळी नागरिकांपैकी १८५ जणांनी मायदेशी परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यातील चार जणांनी नंंतर चीनमध्येच राहाण्याचा निर्णय घेतला. आणखी सहा जणांना वैद्यकीय कारणांमुळे नेपाळला परतणे शक्य झाले नाही. नेपाळमध्ये परत आणलेल्या १७५ जणांना भक्तपूर जिल्ह्यातील खारीपाटी येथे नेपाळ इलेक्ट्रिसिटी आॅथॉरिटी ट्रेनिंग सेंटर येथे त्यांना स्वतंत्र कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. तिथे त्यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे.क्रूझवरील आणखी दोन भारतीय करोनाग्रस्तच्जपानमध्ये योकोहामा बंदरामध्ये नांगरून ठेवलेल्या डायमंड प्रिन्सेस या क्रूझवरील भारतीयांपैकी आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली असून त्यामुळे तेथील भारतीय रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे. याआधी तिथे कोरोनाचा संसर्ग झालेल्या तीन भारतीयांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. या क्रूझवरील प्रवासी, कर्मचाºयांपैकी कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या रविवारी ३५५ झाली आहे. तिथे ३७०० जण आहेत. त्यात शनिवारी ७० नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. क्रूझवर १३८ भारतीय असून त्यामध्ये १३२ कर्मचारी व ६ प्रवासी आहेत.या भारतीय नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यात येत असल्याचे जपानमधील भारतीय राजदूतावासाने म्हटले आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीनIndiaभारत