शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

आश्चर्य : 'या' देशात बार, शाळा अन् सगळंच सुरू, तरीही कोरोनावर मिळवले नियंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 11:57 AM

आंद्रेस टेगनेल यांनी स्वीडन सरकारला लॉकडाऊन ऐवजी केवळ सोशल डिस्टंसिंगवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता. आता येथील नव्या कोरोनाबाधितांची संख्याही कमी झाली आहे आणि मृतांचा आकडाही स्थिर झाला आहे. यावरून स्वीडनने उचललेले हे पाऊन यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. 

ठळक मुद्देस्वीडन सरकारने देशातील जनतेला केवळ सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करण्याचा आग्रह केला होतायेथील नव्या कोरोनाबाधितांची संख्याही घटली आणि मृतांचा आकडाही स्थिर झाला आहेस्वीडनने सरकारने शाळा, जीम, कॅफे, बार्स आणि रेस्टोरंट्स बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही

स्टॉकहोम : जगात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देशांनी कोरोनाचा सामना करण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला. परिणामी अनेक देशांतील उद्योग-धंदे ठप्प झाले आणि जनता घरातच कैद झाली. स्वीडनने मात्र, हा पर्याय नाकारला होता. यानंतर जागतीक आरोग्य संघटना आणि अनेक देशांनी स्वीडनवर टीकाही केली होती. स्वीडन सरकारने देशातील जनतेला केवळ सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करण्याचा आग्रह केला होता. आता स्वीडनमधील टॉप एपिडेमियोलॉजिस्टनी, सरकारचा हा निर्णय यशस्वी ठरला असून कोरोना संक्रमण पूर्णपणे नियंत्रित असल्याचा दावा केला आहे.

ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, आंद्रेस टेगनेल यांनी स्वीडन सरकारला लॉकडाऊन ऐवजी केवळ सोशल डिस्टंसिंगवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता. आता येथील नव्या कोरोनाबाधितांची संख्याही कमी झाली आहे आणि मृतांचा आकडाही स्थिर झाला आहे. यावरून स्वीडनने उचललेले हे पाऊन यशस्वी ठरल्याचे दिसत आहे. 

स्वीडनमध्ये शाळा, जीम बार सुरूच -संपूर्ण जगात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असतानाही स्वीडनने शाळा, जीम, कॅफे, बार्स आणि रेस्टोरंट्स बंद करण्याचा निर्णय घेतला नाही. या उलट, सरकार आपल्या नागरिकांना वारंवार सोशल डिस्टंसिंगचे काटेकरपणे पालन करण्याचे आवाहन करत होते. यामुळे स्वीडनने केवळ कोरोनावरच नियंत्रण मिळवले नाही, तर लॉकडाऊनमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानापासूनही स्वतःचा बचाव केला आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जगातील सर्वोत्तम हेल्थ केयर सिस्टिम स्वीडनकडेच आहे. त्यामुळे, असा धोका पत्करण्यासाठी त्यांना इतर देशांप्रमाणे विचार करावा लागला नाही.

स्वीडनमध्ये 1500 हून अधिक लोकांचा मृत्यू -स्वीडनमध्ये आतापर्यंत 14000 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1540 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी येथे 500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. टेगनेल यांनी म्हटले आहे, की स्वीडनमध्ये आता कोरोनाबाधितांची संख्या कमी होणे सुरू झाले आहे. आता जो ट्रेंड सामोर येत आहे, त्यानुसार या स्थिरतेचे रुपांतर हळू-हळू रुग्ण संख्या कमी होण्यात होईल. 

स्वीडन पब्लिक हेल्थ अथोरिटीच्या डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजीचे प्रमुख केरिन टेगमार्क व्हिसेल यांच्या मतेही, आता कोरोनाबाधितांची संख्या कमी व्हायला सुरुवात झाली आहे. हा अत्यंत चांगला संकेत आहे. आता आयसीयूमध्येही रुग्णांची संख्या कमी व्हायला सुरुवात झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टर