शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:16 IST

Shashi Tharoor in Russia: काँग्रेस नेते शशी थरुर पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबतच्या मतभेदांमुळे चर्चेत आहेत.

Shashi Tharoor in Russia: काँग्रेस खासदार शशी थरुर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केल्यामुळे, त्यांचे आपल्याच पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांसोबतचे मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. अशा परिस्थितीत, थरुर सध्या रशिया दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात त्यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचीही भेट घेतली. मात्र, हा त्यांचा वैयक्तिक दौरा असल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शशी थरुर हे रशियाच्या सरकारी टेलिव्हिजन नेटवर्क आरटीच्या निमंत्रणावरुन त्यांच्या 'अ‍ॅन एरा ऑफ डार्कनेस: द ब्रिटिश एम्पायर' आणि 'इंडिया: फ्रॉम मिडनाईट टू द मिलेनियम अँड बियॉन्ड' या पुस्तकांवर आधारित माहितीपट मालिकेचे प्रमोशन करण्यासाठी मॉस्कोला गेले आहेत. त्यांच्या पुस्तकात ब्रिटिश राजवटीचा भारतावरील परिणाम आणि त्यांच्या राजवटीच्या दडपशाही धोरणांचे वर्णन आहे.

प्रिमाकोव्ह रीडिंग्ज म्हणजे काय?एक्स वर रशियन परराष्ट्र मंत्री लावरोव्ह यांच्याशी झालेल्या भेटीचा फोटो पोस्ट करताना थरूर यांनी लिहिले की, 'मॉस्कोमध्ये 'प्रिमाकोव्ह रीडिंग्ज' दरम्यान जुने मित्र सर्गेई लावरोव्ह यांना भेटून आनंद झाला.' प्रिमाकोव्ह रीडिंग्ज हे एक जागतिक व्यासपीठ आहे, जिथे आंतरराष्ट्रीय संबंध आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर चर्चा केली जाते. भारतासह ४० देशांचे तज्ज्ञ या वार्षिक बैठकीत सहभागी होतात.

या व्यासपीठाचे नाव रशियाचे माजी पंतप्रधान येवगेनी प्रिमाकोव्ह यांच्या नावावर आहे. दरवर्षी हा कार्यक्रम इन्स्टिट्यूट ऑफ वर्ल्ड इकॉनॉमी अँड इंटरनॅशनल रिलेशन्स आणि रशियन परराष्ट्र मंत्रालय आयोजित करते. या व्यासपीठावर, विविध विषयांचे तज्ञ आंतरराष्ट्रीय सुरक्षा, आर्थिक सहकार्य, हवामान बदल, दहशतवाद आणि सायबर सुरक्षा यासारख्या जागतिक आव्हानांवर खुलेपणाने चर्चा करतात.

थरुर यांच्या पुस्तकावर बनवलेला माहितीपटरशियाच्या सरकारी टेलिव्हिजन नेटवर्क आरटीने थरुर यांच्या पुस्तकांवर 'इम्पीरियल रिसीप्स विथ डॉ. शशी थरूर' ही दहा भागांची माहितीपट मालिका बनवली आहे. या मालिकेच्या प्रमोशनसाठी काँग्रेस खासदार रशियामध्ये आयोजित टीव्ही कार्यक्रम आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आले आहेत.

थरूर यांच्या माहितीपटाची रिलीज तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. परंतु आरटीच्या लोकप्रिय शो 'द सांचेझ इफेक्ट' मध्ये त्याच्या काही क्लिप्स प्रेक्षकांना दाखवण्यात आल्या आहेत. शोचे होस्ट रिक सांचेझ यांच्याशी झालेल्या संभाषणात शशी थरूर म्हणाले, 'आम्ही ब्रिटिश वसाहतवादावर आधारित दहा भागांची मालिका पूर्ण केली आहे, ती माझ्या लेखन आणि संशोधनावर आधारित आहे. मला आशा आहे की, तुमचे प्रेक्षक ती नक्कीच पाहतील. याशिवाय, त्यांनी मॉस्कोमधील अनेक थिंकटँक्सची भेट घेतली.

थिंक टँकशी बैठकापरराष्ट्र व्यवहारांवरील संसदेच्या स्थायी समितीचे प्रमुख असलेले थरुर यांनी संयुक्त राष्ट्रांमधील रशियाचे माजी राजदूत आंद्रेई डेनिसोव्ह यांचीही भेट घेतली, जे आता रशियन फेडरेशन कौन्सिलच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार समितीचे उपाध्यक्ष आहेत. थरुर यांनी दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले की, 'जुने मित्र आंद्रेई डेनिसोव्ह, संयुक्त राष्ट्र आणि चीनमधील माजी रशियन राजदूत आणि आता रशियन फेडरेशन कौन्सिलच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार समितीचे उपाध्यक्ष यांना भेटून आनंद झाला.'

शिष्टमंडळाद्वारे मांडली भारताची बाजूपहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरबद्दल जगाला भारताची बाजू सांगण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करताना शशी थरुर यांनी अलीकडेच अमेरिका आणि इतर चार देशांचा दौरा केला. या दरम्यान त्यांनी भारताची बाजू जोरदारपणे मांडली आणि दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड केला. मॉस्कोमध्येही, रशियन लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष लिओनिड स्लुत्स्की यांच्याशी झालेल्या चर्चेत थरूर यांनी दहशतवादाविरुद्ध भारताच्या शून्य सहनशीलतेच्या धोरणाचा उल्लेख केला आणि पाकिस्तानला दहशतवादासाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हटले.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरrussiaरशियाIndiaभारतcongressकाँग्रेसBJPभाजपाPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर