"हिंमत असेल तर या, मी तुमची वाट पाहतोय"; 'या' देशाच्या राष्ट्राध्यक्षांचं डोनाल्ड ट्रम्प यांना ओपन चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 12:34 IST2026-01-07T12:32:12+5:302026-01-07T12:34:20+5:30
व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने केलेल्या लष्करी कारवाईनंतर आता तणाव अधिकच वाढला आहे.

"हिंमत असेल तर या, मी तुमची वाट पाहतोय"; 'या' देशाच्या राष्ट्राध्यक्षांचं डोनाल्ड ट्रम्प यांना ओपन चॅलेंज
व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने केलेल्या लष्करी कारवाईनंतर आता लॅटिन अमेरिकेतील तणाव अधिकच वाढला आहे. यावेळी अमेरिकेच्या निशाण्यावर कोलंबिया असू शकतो, असा दावा खुद्द कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी केला आहे. या शक्यतेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा देताना पेट्रो म्हणाले, "जर हिंमत असेल तर या, मी इथेच तुमची वाट पाहत आहे."
व्हेनेझुएलातील ऑपरेशननंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी एका निवेदनात म्हटलं होतं की, कोलंबिया देश एका "आजारी" नेत्याच्या हातात आहे, जो अमेरिकेत कोकेनचा पुरवठा करतो. कोलंबियावर लष्करी कारवाई करणं हा एक चांगला विचार ठरू शकतो. या विधानानंतर कोलंबियाची राजधानी बोगोटा येथे राजकीय खळबळ उडाली आहे.
Colombia’s President Gustavo Petro appears to taunt U.S. President Donald Trump, saying, “Come get me, coward! I’m waiting for you here.” pic.twitter.com/Qk3MfsfsqO
— Geo View (@theGeoView) January 5, 2026
ट्रम्प यांच्या विधानाचा समाचार घेताना गुस्तावो पेट्रो म्हणाले, "जर अमेरिकेने हल्ला केला, तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल." त्यांनी इशारा दिला की, अमेरिकन हल्ल्याच्या परिस्थितीत देश पुन्हा शस्त्र उचलण्यास भाग पडू शकतो आणि मोठ्या प्रमाणावर 'गुरिल्ला' संघर्ष सुरू होऊ शकतो. जर एखाद्या लोकप्रिय राष्ट्राध्यक्षाला अटक करण्याचा प्रयत्न झाला, तर जनतेचा राग 'जॅग्वार'प्रमाणे उसळून येईल, असंही पेट्रो यांनी ठणकावून सांगितलं.
"आमच्या कंपन्यांना बाहेर काढलं..."; व्हेनेझुएला एअर स्ट्राईकनंतर ट्रम्प यांचा जुना Video व्हायरल
राष्ट्राध्यक्षांच्या संतप्त विधानानंतर कोलंबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयाने स्पष्ट केलं की, कोलंबियाला चर्चेच्या आणि परस्पर आदराच्या जोरावर आंतरराष्ट्रीय संबंध टिकवायचे आहेत आणि कोणत्याही प्रकारची धमकी किंवा बळाचा वापर त्यांना मान्य नाही. ऑक्टोबरमध्ये अमेरिकेने पेट्रो आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांवर ड्रग्ज तस्करीच्या आरोपावरून निर्बंध लादले होते. कोलंबिया हे जगातील कोकेन उत्पादनाचे सर्वात मोठे केंद्र मानले जाते, ज्यामुळे अमेरिका दीर्घकाळापासून नाराज आहे.