क्लिंटनना हिलरी करायच्या जबर मारहाण

By Admin | Updated: October 8, 2015 04:56 IST2015-10-08T04:56:45+5:302015-10-08T04:56:45+5:30

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांना त्यांची पत्नी हिलरी घरात रक्त निघेपर्यंत मारहाण करायच्या, जड वस्तूने हल्ला करायच्या, बोचकारायच्या असा दावा नव्या पुस्तकात

Clintona rush to hurry | क्लिंटनना हिलरी करायच्या जबर मारहाण

क्लिंटनना हिलरी करायच्या जबर मारहाण

न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांना त्यांची पत्नी हिलरी घरात रक्त निघेपर्यंत मारहाण करायच्या, जड वस्तूने हल्ला करायच्या, बोचकारायच्या असा दावा नव्या पुस्तकात करण्यात आला आहे. अमेरिकन अध्यक्षपदासाठी पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षातर्फे हिलरी क्लिंटन या इच्छुक आहेत, हे विशेष.
हिलरी या बिल क्लिंटननाच मारहाण करायच्या असे नाही, तर स्वत:चे गुप्तचर एजंटस् व कर्मचाऱ्यांनाही त्यांनी सोडले नाही. रॉजर स्टोन हे राजकीय रणनीतिकार व सल्लागार असून त्यांनी ‘द क्लिंटन्स वॉर आॅन वूमेन्स’ या नावाने लिहिलेल्या पुस्तकात हा खळबळजनक दावा केला आहे. हे पुस्तक १३ आॅक्टोबर रोजी प्रकाशित होणार आहे. त्यात क्लिंटन दाम्पत्यातील वैवाहिक बेबनाव उघड करण्यात आला आहे. स्टोन यांनी ‘न्यूयॉर्क पोस्ट’ला सांगितले की अध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्यासाठी हिलरी जी मोहीम राबवीत आहेत, त्यातील हिलरी या बनावट आहेत. तो त्यांचा खरा चेहरा नाही. हिलरी यांनी गेल्या काही दिवसांत आपण सौम्य, सुसह्णआहोत, असे ठसविण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात त्यांचा स्वभाव हा अस्थिर, चंचल असून त्यातून त्यांना क्रोधाचा झटका येतो व त्यात मग त्या पती बिल यांना आणि आपल्या गुप्तचर एजंटस् व कर्मचाऱ्यांना मारहाण करीत, वाईटसाईट बोलत. बिल क्लिंटनशी त्यांचे असे वागणे हे ते अर्कान्सासचे गव्हर्नर होते म्हणजे काही दशकांपूर्वीपासून होते.

Web Title: Clintona rush to hurry