प्राचीन जहाजाच्या अवशेषात टॅब्लेट कॉम्प्युटर मिळाल्याचा दावा

By Admin | Updated: May 25, 2014 23:36 IST2014-05-25T18:26:06+5:302014-05-25T23:36:34+5:30

प्राचीन जहाजाच्या अवशेषातून तुर्कस्तानी पुरातत्ववेत्त्यांनी

Claim of a Tablet computer in the ancient shipyard | प्राचीन जहाजाच्या अवशेषात टॅब्लेट कॉम्प्युटर मिळाल्याचा दावा

प्राचीन जहाजाच्या अवशेषात टॅब्लेट कॉम्प्युटर मिळाल्याचा दावा

वॉशिंग्टन- प्राचीन जहाजाच्या अवशेषातून तुर्कस्तानी पुरातत्ववेत्त्यांनी १२०० वर्षांची एक लाकडी वस्तू शोधून काढली असून, हा जुन्या काळातील टॅब्लेट संगणक आहे, असा त्यांचा दावा आहे.
तुर्कस्तानची राजधानी इस्तंबुलजवळील येनकापी भागात ३७ जहाजे वर काढण्यात आली आहेत. हे थिओडोसियस बंदर म्हणून ओळखले जाते. बायझेंटाईन सम्राट थिओडोसियस याने चौथ्या शतकात ते बांधले होते व व्यावसायिक बंदर म्हणून ते भरभराटीला आले होते. या लाकडी वस्तूच्या झाकणावर कोरीव काम केलेले आहे, त्याचा आकार सध्याच्या ७ इंची टॅब्लेटएवढा आहे; पण रुंदी जास्त आहे. हा जहाजाच्या कॅप्टनचा असण्याची शक्यता आहे. या पेटीवर पाच चौकोनी पॅनेल असून, त्यावर ग्रीक भाषेत मजकूर लिहिला आहे. डिस्कव्हरी वाहिनीने हे वृत्त दिले आहे. ज्या बुडालेल्या जहाजात हे उपकरण सापडले आहे, ते जहाज ९ व्या शतकातील आहे. ते काळ्या समुद्रात प्रवास करत होते, क्रिमियातून कर्सोनिआस येथे वस्तूंची वाहतूक करत होते असा अंदाज आहे.

Web Title: Claim of a Tablet computer in the ancient shipyard