चीनला मोठा धक्का, सॅटेलाइट लॉन्‍च व्हेइकल रस्त्यातच फेल; ड्रॅगनचा दावा ठरला 'फुसका' 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 06:19 PM2020-07-10T18:19:53+5:302020-07-10T18:27:44+5:30

या घटनेत Long March 5B रॉकेटचा हा 30 मीटर लांबा आणि 5 मीटर रुंद असलेला भाग, जवळपास 20 मेट्रिक टन एवढा होता. गेल्या 30 वर्षांत पृथ्वीच्या वातावरणात अनियंत्रित होऊन परतणारा हा सर्वात मोठा ऑब्जेक्ट होता, असे मानले जाते.

chinas satellite launch vehicle kuaizhou 11 fails in the space | चीनला मोठा धक्का, सॅटेलाइट लॉन्‍च व्हेइकल रस्त्यातच फेल; ड्रॅगनचा दावा ठरला 'फुसका' 

चीनला मोठा धक्का, सॅटेलाइट लॉन्‍च व्हेइकल रस्त्यातच फेल; ड्रॅगनचा दावा ठरला 'फुसका' 

Next
ठळक मुद्देशुक्रवारी स्‍थानिक वेळेनुसार, दुपारी साधारणपणे 12:17 वाजता हे सॅटेलाइट फेल झाले.जवळपास 70.8 टन पेलोड नेण्याची या रॉकेटची क्षमता आहे.हा चीनी उपग्रह अंतराळाच्या खालच्या कक्षेत उपग्रहांना स्थापित करण्याचे काम करतो.

पेइचिंग : अवकाश तंत्रज्ञानाच्या दुनियेत आधिराज्य गाजवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या चीनला शुक्रवारी जबरदस्त झटका बसला. चीनचे सर्वात मोठे घन इंधनावर चालणारे रॉकेट कुआईझाउ-11 पश्चिमोत्‍तर चीनमध्ये जिकउक्‍वान सॅटेलाइट लॉन्‍च सेन्टरमध्ये फेल झाले. शुक्रवारी स्‍थानिक वेळेनुसार, दुपारी साधारणपणे 12:17 वाजता हे सॅटेलाइट फेल झाले.

चीनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनसूर, हे सॅटेलाइट का फेल झाले याचा शोध घेतला जात आहे. चीनने कमी पैशांमध्ये अंतराळात उपग्रह पाठवण्यासाठी हे सॅटेलाइट तयार केले होते. हे अत्यंत विश्वसनीय रॉकेट असल्याचा चीनचा दावा आहे.  मात्र, या घटनेमुळे चीनचा दावा फुसका ठरला आहे. जवळपास 70.8 टन पेलोड नेण्याची या रॉकेटची क्षमता आहे.

हा चीनी उपग्रह अंतराळाच्या खालच्या कक्षेत उपग्रहांना स्थापित करण्याचे काम करतो. यापूर्वी याच वर्षी मे महिन्यात आपल्या स्पेस स्टेशनवर कार्गो घेऊन जाण्याच्या हेतूने लॉन्च करण्यात आलेले चीनचे टेस्ट रॉकेट काही तांत्रिक कारणांमुळे फेल झाले होते. या रॉकेटचा मोठा भाग पृथ्वीच्या वातावरणात अनियंत्रित झाला होता. यावेळी एक मोठा अपघात थोडक्यात टळला होता. 

या घटनेत Long March 5B रॉकेटचा हा 30 मीटर लांबा आणि 5 मीटर रुंद असलेला भाग, जवळपास 20 मेट्रिक टन एवढा होता. गेल्या 30 वर्षांत पृथ्वीच्या वातावरणात अनियंत्रित होऊन परतणारा हा सर्वात मोठा ऑब्जेक्ट होता, असे मानले जाते. यापूर्वी 1991मध्ये जवळपास 39 टनांचा सोवियत यूनियन स्पेस स्टेशन Salyut अशाच पद्धतीने येऊन पडला होता.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : कोरोना व्हॅक्सीनवर एकाच दिवसात दोन 'गुड न्‍यूज'; 'या' देशाची व्हॅक्सीन फक्त एक पाऊल दूर

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

कोरोना तर पहिली लाट; जगाला भोगावे लागतील दूरगामी परिणाम - चीनची धमकी

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

CoronaVirus News : धक्कादायक! 'या' 8 राज्यांत कोरोनाचे तब्बल 90 टक्के रुग्ण, 86 टक्के मृत्यू फक्त 6 राज्यात

Web Title: chinas satellite launch vehicle kuaizhou 11 fails in the space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.