चीनची बुलेट ट्रेन भारताच्या सीमेपर्यंत; तिबेटमधील पहिली रेल्वे, ताशी १६० किमी वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 07:02 AM2021-06-26T07:02:02+5:302021-06-26T07:02:08+5:30

तिबेटमधील पहिली रेल्वे : ४३५ किमी प्रवास, ताशी १६० किमी वेग

China's bullet train to India's border; The first train in Tibet, 160 km per hour | चीनची बुलेट ट्रेन भारताच्या सीमेपर्यंत; तिबेटमधील पहिली रेल्वे, ताशी १६० किमी वेग

चीनची बुलेट ट्रेन भारताच्या सीमेपर्यंत; तिबेटमधील पहिली रेल्वे, ताशी १६० किमी वेग

Next

बीजिंग : तिबेटमध्ये चीनने पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक बुलेट रेल्वे शुक्रवारी सुरू केली. अरुणाचल प्रदेशच्या जवळ असलेल्या निंगची हे गाव आणि तिबेटची राजधानी ल्हासा यांना ही रेल्वे जोडते. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचा शतकमहोत्सवी कार्यक्रम १ जुलै रोजी होत असून, त्या पार्श्वभूमीवर सिचुआन-तिबेट रेल्वे सेक्शनच्या ल्हासा-निंगची या ४३५.५ किलोमीटरचे उद्घाटन झाले. तिबेट हा स्वायत्त प्रांत आहे. 

या रेल्वेचा वेग ताशी १६० किलोमीटर असून, ती सिंगल लाइन इलेक्ट्रिफाइड आहे. ल्हासासह नऊ स्टेशन्सवर ती थांबेल. प्रवासी आणि मालवाहतूक अशी दोन्ही सेवा देणारी ही रेल्वे आहे. ल्हासा-निंगची रेल्वेने ल्हासा ते निंगची हा रस्ता मार्गे प्रवास पाच ते अंदाजे साडेतीन तास इतका कमी केला आहे. या रेल्वेमार्गावर ४७ बोगदे आणि १२१ पूल आहेत आणि स्थानिक पातळीवर ओळखली जाणारी यार्लुंग झॅंगबो नावाची ब्रह्मपुत्रा नदी ही रेल्वे १६ वेळा ओलांडते. एकूण रेल्वेमार्गाचा अंदाजे ७५ टक्के भाग हा बोगदे आणि पुलांंनी व्यापलेला आहे. 

या रेल्वेची मालवाहतुकीची क्षमता वार्षिक दहा दशलक्ष टनांची आहे. यामुळे तिबेटचा विकास होईल आणि लोकांचे जीवनमान सुधारेल, असे ‘शिनहुआ’ या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले. किंगघई-तिबेट रेल्वेनंतर सिचुआन-तिबेट रेल्वे ही तिबेटमधील दुसरी सेवा आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी तिबेटमध्ये सिचुआन प्रांत आणि निंगचीला जोडणारा हा नवा रेल्वे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यास नोव्हेंबरमध्ये सांगितले होते. अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेट असल्याचा चीनचा दावा भारताने ठामपणे फेटाळून लावला आहे. भारत-चीन यांच्यातील सीमावाद हा  ३,४८८ किलोमीटर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून आहे.

आवश्यक साहित्य पुरिवणे सोपे होणार

शिंघुआ युनिव्हर्सिटीतील नॅशनल स्ट्रॅटेजी इन्स्टिट्यूटच्या संशोधन विभागाचे संचालक किॲन फेंग सरकारी दैनिक ‘ग्लोबल टाइम्स’ शी बोलताना म्हणाले होते की, चीन- भारत सीमेवर कोणताही पेचप्रसंग निर्माण झाला, तर व्यूहरचनेच्यादृष्टीने आवश्यक साहित्य पुरवणे या रेल्वेने मोठे सोयीचे होईल.

Web Title: China's bullet train to India's border; The first train in Tibet, 160 km per hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.