शी जिनपिंग यांना महागात पडणार सैन्य शक्तीप्रदर्शन? सतावू लागली खुर्चीची चिंता
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 18:56 IST2020-09-13T18:37:04+5:302020-09-13T18:56:33+5:30
2022मध्ये होणाऱ्या नॅशनल काँग्रेसपूर्वी देशाची सुरक्षितता अधिक बळकट करण्याची जिनपिंग यांची इच्छा आहे. जे लोक पक्षाप्रती प्रामाणिक अथवा एकनिष्ठ नाहीत, अशांना शोधण्यासाठी जिनपिंग यांचे विश्वासू शेन यिशिन यांनी एक मोहीमदेखील चालवली होती.

शी जिनपिंग यांना महागात पडणार सैन्य शक्तीप्रदर्शन? सतावू लागली खुर्चीची चिंता
पेइचिंग - संपूर्ण जगावर चीनचा दबदबा निर्माण व्हावा आणि देश महाशक्ती व्हावा, असे स्वप्न पाहणाऱ्या जिनपिंग यांना आता आपल्या खुर्चीची चिंता सतावू लागली आहे. देशात सत्तांतर होण्याची भीती जिनपिंग यांना वाटू लागली आहे. यामुळेच, आता त्यांनी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. पोलीस अधिकारी, न्यायाधीश आणि स्टेट सिक्यॉरिटी एजंट्स हे केवळ त्यांनाच उत्तरदायी असावेत, असे त्यांना वाटते आहे.
सत्तांतराची भीती -
वॉशिंगटन डीसीमध्ये उइगर टाइम्स एजन्सीचे संस्थापक ताहिर इमीन यांनी Expressला सांगितले, 'ते पृथ्वीवरील असे एकमेव नेते आहेत, जे केंद्र सरकारमध्ये सर्वच्या सर्व 11 पदे घेऊ शकतात' माजी CCP पार्टी स्कूल प्रफेसर चाय शिया यांनी गेल्या महिन्यात FRA चायनीजला सांगितले, 'CCPअंतर्गत शी यांना मोठे आव्हान आहे. यासंदर्भात त्यांना माहिती आहे. तसेच अमेरिकेचा चिनी अर्थव्यवस्थेवरील दबाव वाढत राहिल्यास CCPची केंद्रीय समिती त्यांना पदावरून बाजूला करण्यासंदर्भात विचार करू शकते.
2022मध्ये होणाऱ्या नॅशनल काँग्रेसपूर्वी देशाची सुरक्षितता अधिक बळकट करण्याची जिनपिंग यांची इच्छा आहे. जे लोक पक्षाप्रती प्रामाणिक अथवा एकनिष्ठ नाहीत, अशांना शोधण्यासाठी जिनपिंग यांचे विश्वासू शेन यिशिन यांनी एक मोहीमदेखील चालवली होती. पक्षांतर्गत एक गट देशांतर्गत आणि देशाबाहेरील प्रकरणांत सैन्य दखल देत असल्याने नाखूश आहे, यामुळे असे केले गेल्याचे मानले जात आहे.
केंद्र सरकारची अडचण वाढली -
आशिया रिसर्च इंस्टिट्यूटमधील सिनिअर फेलो अँड्रियस फुल्डा यांनी म्हटले आहे, की शी यांना चीनबाहेरूनही धोका आहे. बाहेरून वाटते, की CCPमध्ये कसल्याही प्रकारचा गोंधळ नाही, मात्र असे नाही. जिनपिंग यांचे कंट्रोल आल्यामुळे शक्तीचे केंद्रीकरण झाल्याने CCPमध्ये अंतर्गत वाद सुरू झाला आहे. काही अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईतून हे सहजपणे समजले जाऊ शकते, की राजकीय केंद्रात स्थानिक अधिकाऱ्यांना कंट्रोलमध्ये ठेवणे केंद्राला अवघड झाले आहे.
राजकीय अस्थिरतेचा काळ -
आपल्यापेक्षा वरिष्ठ CCP अधिकाऱ्यांना अधिक संरक्षण मिळते. यामुळे पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही नाराजी दिसून येते. यामुळे चीनमध्ये राजकीय अस्थिरता आणि पतनाचा काळ सुरू होताना दिसत आहे. जिनपिंग यांनी 2018मध्ये राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळाची मर्यादा संपुष्टात आणून स्वतःला नेहमीसाठी सुप्रीम लीडर म्हणून घोषित केले होते. सत्तांतराच्या भीतीमुळे जिनपिंग यांनी, असे केल्याचे मानले जाते.
महत्त्वाच्या बातम्या -
CNG, PNG डिस्ट्रिब्यूटर होण्याची संधी, मोदी सरकार देणार लायसन्स
कोरोना व्हायरस : "जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं"; पंतप्रधान मोदींनी दिला सावधगिरीचा इशारा
मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी
कमावण्याची संधी : 'या' IPOमध्ये पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, फक्त 3 तासांतच सुपरहिट!