एलएसीबाबतचा भारताचा प्रस्ताव चीनने फेटाळला

By Admin | Updated: June 4, 2015 23:38 IST2015-06-04T23:38:29+5:302015-06-04T23:38:29+5:30

भारत- चीन सीमेवरील शांततेसाठी अरुणाचलातील एलएसी (प्रत्यक्ष ताबा रेषा) संबंधातील स्थिती स्पष्ट करावी, असा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलेला प्रस्ताव चीनने फेटाळला

China rejects India proposal for LAC | एलएसीबाबतचा भारताचा प्रस्ताव चीनने फेटाळला

एलएसीबाबतचा भारताचा प्रस्ताव चीनने फेटाळला

बीजिंग : भारत- चीन सीमेवरील शांततेसाठी अरुणाचलातील एलएसी (प्रत्यक्ष ताबा रेषा) संबंधातील स्थिती स्पष्ट करावी, असा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवलेला प्रस्ताव चीनने फेटाळला असून, त्याऐवजी कोड आॅफ कंडक्टसंदर्भात भारताशी करार करण्याची आपली इच्छा असल्याचे जाहीर केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावावर चीनने ही पहिली जाहीर प्रतिक्रिया दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे उपसरसंचालक हुआंग शियान यांनी याबाबत चीनची भूमिका स्पष्ट करताना असे सांगितले की, एलएसीसंदर्भात परिस्थिती स्पष्ट करण्याच्या आधीच्या प्रयत्नांना यश आलेले नाही. वाटाघाटी अयशस्वी होऊ नयेत म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत. वाटाघाटी पूर्णत्वाच्या टप्प्यावर आल्या की आपल्याला पुढचे पाऊल टाकता येईल; पण वाटाघाटी अयशस्वी झाल्या, तर पुढची परिस्थिती आणखी कठीण होईल. (वृत्तसंस्था)

Web Title: China rejects India proposal for LAC