अंतर्गत भागातून थेट समुद्रात मालवाहतूक; चीनचा ‘पिंगलू कालवा’ प्रकल्प अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 17:36 IST2026-03-25T17:36:32+5:302026-03-25T17:36:49+5:30

China Pinglu Canal : चीन बांधतोय जगातील सर्वात मोठा कालवा!

China Pinglu Canal: Direct cargo transport from inland areas to the sea; China's 'Pinglu Canal' project in final stage | अंतर्गत भागातून थेट समुद्रात मालवाहतूक; चीनचा ‘पिंगलू कालवा’ प्रकल्प अंतिम टप्प्यात

अंतर्गत भागातून थेट समुद्रात मालवाहतूक; चीनचा ‘पिंगलू कालवा’ प्रकल्प अंतिम टप्प्यात

China Pinglu Canal : चीनमध्ये उभारण्यात येत असलेला 83 मैल (सुमारे 134 किमी) लांबीच्या 'पिंगलू कालवा' (Pinglu Canal) प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर चीनच्या अंतर्गत भागातून थेट समुद्रमार्गे मालवाहतूक शक्य होणार आहे. या प्रकल्पाकडे जगभरातील व्यापार आणि पायाभूत सुविधा क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

अंतर्गत भागातून थेट समुद्रात

हा कालवा ग्वांग्शी प्रांतातील नॅनिंग परिसरातून सुरू होऊन चिनजियांग नदीमार्गे बेईबू गल्फपर्यंत जाणार आहे. कालवा सुरू झाल्यानंतर अंतर्गत नदीमार्गावरील जहाजे थेट समुद्रापर्यंत पोहोचू शकतील, ज्यामुळे मालवाहतूक जलद आणि स्वस्त होईल. हा प्रकल्प चीनच्या “न्यू इंटरनॅशनल लँड-सी ट्रेड कॉरिडॉर” या मोठ्या व्यापार नेटवर्कचा महत्त्वाचा भाग मानला जात आहे.

वाहतूक खर्चात मोठी बचत अपेक्षित

सध्या या भागातील मालवाहतूक लांब मार्गाने करावी लागते. नवीन कालव्यामुळे सुमारे 348 मैलांचा प्रवास कमी होणार असून, दरवर्षी 5.2 अब्ज युआन (सुमारे 750 दशलक्ष डॉलर) लॉजिस्टिक खर्चाची बचत होण्याचा अंदाज आहे. यामुळे उद्योग आणि निर्यात क्षेत्राला मोठा फायदा होईल.

मोठ्या जहाजांसाठी विशेष व्यवस्था

हा कालवा 5,000 मेट्रिक टन क्षमतेच्या जहाजांसाठी तयार केला जात आहे. कालव्यात तीन मोठे शिप लॉक सिस्टम, 27 नवीन किंवा पुनर्बांधलेले पूल आणि सुमारे 213 फूट पाण्याच्या पातळीतील फरक नियंत्रित करण्याची प्रणाली असेल.

दक्षिण-पूर्व आशियाशी व्यापार वाढवण्यावर भर

चीनचा व्यापार आता दक्षिण-पूर्व आशियाकडे वाढत आहे. 2025 मध्ये ASEAN देशांकडे चीनची निर्यात 13.4 टक्क्यांनी वाढली, तर अमेरिकेकडे निर्यात सुमारे 20 टक्क्यांनी घटली. त्यामुळे बेईबू गल्फ परिसरातील बंदरांचे महत्त्व वाढले आहे.

पर्यावरण संरक्षणावर विशेष लक्ष

कालवा प्रकल्पामुळे पर्यावरणावर परिणाम होऊ नये यासाठी 36 पर्यावरण संरक्षण क्षेत्र, मास्यांसाठी विशेष मार्ग आणि प्राण्यांच्या हालचालींसाठी क्रॉसिंग अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

2026 मध्ये प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता

फेब्रुवारी 2026 पर्यंत या प्रकल्पाचे 90 टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले असून, सुमारे 92 टक्के बजेट खर्च झाले आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 72.7 अब्ज युआन (सुमारे 10.5 अब्ज डॉलर) आहे. हा प्रकल्प 2026 च्या शेवटी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Web Title : चीन का पिंगलू नहर प्रोजेक्ट अंतिम चरण में, समुद्री व्यापार को बढ़ावा

Web Summary : चीन की 134 किलोमीटर लंबी पिंगलू नहर परियोजना जल्द ही पूरी होने वाली है, जिससे अंतर्देशीय क्षेत्रों से सीधे समुद्री माल ढुलाई संभव हो सकेगी। चीन के व्यापार गलियारे का हिस्सा, यह परियोजना 348 मील की यात्रा को कम करती है, जिससे सालाना 750 मिलियन डॉलर की बचत होगी। बड़े जहाजों के लिए डिज़ाइन किया गया, यह पर्यावरण संरक्षण को प्राथमिकता देता है और 2026 के अंत तक पूरा होने की उम्मीद है।

Web Title : China's Pinglu Canal Project Nears Completion, Boosting Sea Trade

Web Summary : China's Pinglu Canal, a 134km waterway, nears completion, enabling direct sea freight from inland regions. This project, part of China's trade corridor, cuts travel by 348 miles, saving $750 million annually. Designed for large ships, it prioritizes environmental protection and is expected to finish by late 2026.