CoronaVirus: चीननं लपवली होती कोरोना मृतांची संख्या; नवी आकडेवारी पाहून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 02:43 PM2020-04-17T14:43:29+5:302020-04-17T15:47:03+5:30

Coronavirus चीनमधील मृतांच्या संख्येत अचानक ३९ टक्क्यांनी वाढ

China increases Wuhans Coroanvirus death toll by 50 percent to 3869 kkg | CoronaVirus: चीननं लपवली होती कोरोना मृतांची संख्या; नवी आकडेवारी पाहून बसेल धक्का

CoronaVirus: चीननं लपवली होती कोरोना मृतांची संख्या; नवी आकडेवारी पाहून बसेल धक्का

Next

बीजिंग: सध्या जगभरात कोरोनानं थैमान घातलं असून बाधितांचा आकडा २० लाखांच्या पुढे गेला आहे. चीनच्या वुहानमधून जगभरात पोहोचलेल्या कोरोना विषाणूनं इटली, अमेरिका, ब्रिटन, स्पेनमध्ये हजारोंचे बळी घेतले. चीनच्या तुलनेत या देशांमधल्या मृतांचा आकडा अतिशय मोठा आहे. मात्र आता अचानक चीननं मृतांच्या आकड्यात वाढ केली आहे. त्यामुळे चीन सरकार कोरोनासंदर्भातली माहिती आणि आकडेवारी जगापासून लपवतंय का, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.

चीनच्या वुहानमध्ये कोरोनामुळे जवळपास ४ हजार जणांचा मृत्यू झाल्याची नवी आकडेवारी समोर आली आहे. एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून वुहान सरकारनं कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या दिली आहे. वुहानमध्ये कोरोनामुळे ३ हजार ८६९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोस्टमध्ये आहे. विशेष म्हणजे आधीच्या आकडेवारीच्या तुलनेत ही संख्या जवळपास ५० टक्क्यांनी जास्त आहे. वुहानमधील सरकारनं मृतांचा आकडा अचानक १ हजार २९० नं वाढवल्यानं संशय व्यक्त केला जात आहे. 

वुहानमधून कोरोनाचा विषाणू चीनमध्ये पसरला. मात्र चीननं कोरोनावर लवकर नियंत्रण मिळवलं. त्या तुलनेत अतिशय उत्तम आरोग्य सुविधा असलेल्या अमेरिकेत आणि युरोपीय देशांमध्ये मात्र कोरोनानं हाहाकार माजवला. कोरोना प्रकरणात संपूर्ण जग चीनकडे संशयानं पाहत आहे. त्यात आता वुहानमधून आलेल्या आकडेवारीनं भर पडली आहे. वुहानमधील कोरोना मृतांच्या संख्येत वाढ करण्यात आल्यानं साहजिकच संपूर्ण देशातल्या मृतांचा आकडादेखील वाढला आहे. कोरोनामुळे चीनमध्ये ४ हजार ६३२ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. आधीच्या तुलनेत ही संख्या ३९ टक्क्यांनी जास्त आहे.

वुहानमधल्या प्रयोगशाळेतूनच कोरोना पसरल्याचा संशय अमेरिकेला आहे. या संदर्भात त्यांनी तपासदेखील सुरू केला आहे. पाश्चिमात्य देशांकडून कोरोना प्रकरणात दबाव वाढू लागताच चीननं अचानक वुहानमधील मृतांचा आकडा वाढवला आहे. त्यामुळे चीनबद्दलचा संशयदेखील वाढला आहे. संपूर्ण चीनमध्ये कोरोनाचे ८२ हजार ३६७ रुग्ण आढळून आले. यातले ५० हजार ३३३ रुग्ण एकट्या वुहानमधले आहेत. 

नोकरीवरून काढून टाकाल तर याद राखा! पंतप्रधान नरेंद्र मोदींची नजर आहे

 

Web Title: China increases Wuhans Coroanvirus death toll by 50 percent to 3869 kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.