China has advised India to stay away from the Cold War between the US and China mac | अमेरिकेला साथ देत चीनच्या विरोधात काही पाऊल उचलंल तर...; चीनने भारताला दिला थेट इशारा

अमेरिकेला साथ देत चीनच्या विरोधात काही पाऊल उचलंल तर...; चीनने भारताला दिला थेट इशारा

चीनमधील वुहान शहरातून सुरु झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरता थैमान घातलं आहे. जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण  61 लाख 53 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 3 लाख 70 हजार 870 वर पोहोचली आहे. कोरोना व्हायरस जागतीक महामारी बनला आहे. यामुळे जगातील सर्वच देश चीनला लक्ष्य करत आहेत. परंतु संपूर्ण जगाच्या टीकेला सामोरा जात असलेला चीन आता सर्वच देशांकडून घेरला जात आहे. मात्र, असे असतानाही त्याची मग्रुरी कमी झालेली नाही. 

कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनवर वारंवार निशाणा साधत आहे. चीनकडूनही अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीनमध्ये ट्रेंड वॉर सुरु आहे. तर दूसरीकडे अमेरिका आणि भारताची मैत्री आणखी घट्ट होत आहे. याचपार्श्वभूमीवर आता चीनने भारताला लक्ष केलं आहे. 

चीनमधील ग्लोबल टाइम्स या वृत्तपत्रानूसार, अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या कोल्ड वॉरपासून भारताने दूर राहण्याचा सल्ला चीनने दिला आहे. भारताने अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या प्रकरणांपासून दूर राहिल्यास चांगले होईल. भारताने अमेरिकेला साथ देत चीनच्या विरोधात काहीही पाऊल उचलंल तर कोरोनासारख्या महामारीसोबतच आर्थिक परिणाम देखील खूप खराब होतील, असा इशारा चीनने भारताला दिला आहे. भारतासोबत सुरु असलेल्या व्यवसायात आणखी चांगले संबंध राखण्याचे आमचे लक्ष असल्याचे देखील चीनने सांगितले आहे.

दरम्यान, ट्रेड वॉरसंदर्भात अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव अद्याप निवळला नसताना कोरोनाने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सार्वजनिकरित्या कोरोनाला चीनी व्हायरस म्हणून संबोधले आहे. त्यांनी चीनवर या व्हायरसच्या जागतीक प्रसाराचा आरोपही लावला आहे. एवढेच नाही, तर या व्हायरसच्या चौकशीसाठी चीन सहकार्य करत नाही, असा आरोपही अमेरिकेने केला आहे. कोरोनाचा सर्वाधिकि फटका बसलेल्या अमेरिकेने जागतीक आरोग्य संघटनेशी असलेले आपले सर्व संबंध तोडले आहेत.

अमेरिकेने चीनवर घातले निर्बंध -

डोनाल्ड ट्रम्प यांनी काही चीनी नागरिकांवर अमेरिकेत येण्यासाठी निर्बंध घालणार असल्याची घोषणा केली आहे.  एवढेच नाही, तर चीनमधून अमेरिकेत होणाऱ्या गुंतवणुकीचे नियमही  कठोर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकन काँग्रेसमध्ये चीनविरोधात कठोर पावले उचलण्यासंदर्भात एक विधेयकही सादर करण्यात आले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: China has advised India to stay away from the Cold War between the US and China mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.