शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

खबरदार! भारताच्या सीमेत घुसखोरी कराल तर...; अमेरिकेनं चीनला ठणकावलं 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 3:37 PM

व्हाईट हाऊसने आपल्या अहवालात म्हटले आहे की, चीन भारतासह सर्व शेजारील देशांमध्ये चिथावणीखोर लष्करी कारवाया करीत आहे.

ठळक मुद्देचिनी सैन्याकडून वारंवार भारताच्या हद्दीत घुसखोरी केली जात आहे. भारताकडूनही या घुसखोरीला योग्य उत्तर दिलं जात आहे.चीनकडून भारताच्या सीमांमध्ये होत असलेला घुसखोरीवर व्हाइट हाऊसनं नाराजी व्यक्त केली आहे. चीन भारतासह सर्व शेजारील देशांमध्ये चिथावणीखोर लष्करी कारवाया करीत आहे. तत्पूर्वी अमेरिकी राजदूतांनीही चीन भारतीय सीमांचं उल्लंघन करत असून, तो दिवसेंदिवस इतर देशांसाठी धोकादायक बनत चालल्याचंही म्हटलं होतं.

वॉशिंग्टनः चिनी सैन्याकडून वारंवार भारताच्या हद्दीत घुसखोरी केली जात आहे. भारताकडूनही या घुसखोरीला योग्य उत्तर दिलं जात आहे. त्याचदरम्यान चीनकडून भारताच्या सीमांमध्ये होत असलेला घुसखोरीवर व्हाइट हाऊसनं नाराजी व्यक्त केली आहे. तसेच चीनला भारताच्या हद्दीत घुसखोरी न करण्याचा इशाराही दिला आहे. गुरुवारी व्हाईट हाऊसने आपल्या अहवालात म्हटले आहे की, चीन भारतासह सर्व शेजारील देशांमध्ये चिथावणीखोर लष्करी कारवाया करीत आहे. तत्पूर्वी अमेरिकी राजदूतांनीही चीन भारतीय सीमांचं उल्लंघन करत असून, तो दिवसेंदिवस इतर देशांसाठी धोकादायक बनत चालल्याचंही म्हटलं होतं.  चिनी सैन्याच्या भारतीय हद्दीत अतिक्रमण करण्याच्या प्रयत्नाविरुद्ध अमेरिकाही आता भारताच्या बाजूने उभा राहिला आहे. बीजिंग आपल्या तत्त्वांचे उल्लंघन करीत आहे आणि पिवळा समुद्र, पूर्व आणि दक्षिण चिनी समुद्र, तैवान सामुद्रधुनी आणि भारत-चीन सीमेवरील घुसखोरीच्या कृत्यांनी शेजारील देशांना चीन घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे, असंही व्हाइट हाऊसच्या अहवालात म्हटले आहे. 'युनायटेड स्टेट्स स्ट्रॅटेजिक अ‍ॅप्रोच टू पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना' या नावाचा अहवाल अमेरिकन कॉंग्रेसला सादर करण्यात आला आहे. या अहवालात अमेरिकी सरकारचे चीनसंदर्भातील धोरण सुस्पष्ट मांडण्यात आले आहे. जगभरात चीन सामर्थ्यपूर्ण होण्याच्या उद्दिष्टानं काम करीत आहे. कोणत्याही देशाला जुमानत नसल्यानं  चीन आपली ताकद वाढल्याचं जगाला दाखवत आहे आणि त्याचबरोबर शक्तीचा दुरुपयोगही करत आहे, असं व्हाइट हाऊसनं म्हटलं आहे. पण अमेरिकेच्या आरोपांत तथ्य नसल्याचंही बीजिंगनं सांगितलं आहे. आम्ही सैन्य शक्तीच्या वापराला विरोध करतो, इतर देशांच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करीत नाहीत आणि शांततेच्या वाटाघाटीद्वारे सर्व वाद मिटविण्यास कटिबद्ध असल्याचंही चीनकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.दरम्यान, भारत चीनच्या घुसखोरीला देत असलेल्या प्रतिसादाचंही अमेरिकेकडून समर्थन करण्यात आलं आहे. दक्षिण चीन समुद्रातही चीन अशीच दादागिरी करत असून, भूमिका बदलण्याच्या मानसिकतेत नाही, असंही परराष्ट्र मंत्रालयाच्या दक्षिण व पश्चिम आशियातील प्रमुख कार्यवाह एलिस वेल्स म्हणाल्या आहेत. चिनी सैन्याच्या चिथावणीखोरीला समोरे जाण्यासाठी आम्ही कायम भारतासोबत आहोत, असंही अमेरिकेनं चीनला ठणकावलं आहे.  एलिस वेल्स म्हणाल्या की, “अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि समान विचारसरणी असलेले आसियान देशांचे  सदस्य चीनच्या चिथावणीखोर आणि त्रासदायक वृत्तीच्या विरोधात एकत्र आले आहेत. चीनला रोखणे आवश्यक आहे. चीन आपली वाढलेली ताकद दाखवण्याचा वारंवार प्रयत्न करत आहे. त्यामुळे चीनच्या शेजारील देशांचा त्याचा धोका आहे, असंही अमेरिकेनं स्पष्ट केलं आहे. 

हेही वाचा

योगी देणार चीनला 'दणका'; बेरोजगारांना लागणार लॉटरी?, अनेक कंपन्या 'ड्रॅगन'ला सोडून UPच्या वाटेवर

CoronaVirus News : "केंद्राने ४६८ कोटी दिले, पण ठाकरे सरकार एक दमडीचंही पॅकेज द्यायला तयार नाही"

CoronaVirus News : शेतकरी संघटनेने मूठभर कापूस जाळून केला शासनाचा निषेध

CoronaVirus News :चार दिवस करा काम अन् तीन दिवस आराम, पंतप्रधानांनी कंपन्यांना सुचवला 'उपाय'

VIDEO: गर्भवती महिलेला घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्ससमोर अचानक आला सिंहांचा कळप अन्...

CoronaVirus News : कोरोना चाचणी स्वस्त होणार; टास्क फोर्स प्रमुखांचे दिलासादायक संकेत

CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात 'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना बोनस देणार अन् 15000 जणांची भरती करणार  

जिओची पाचवी मोठी डील, अमेरिकन कंपनी KKRने गुंतवले 11,367 कोटी

CoronaVirus News : केंद्राला घेरण्यासाठी सोनियांनी विरोधकांची बोलावली बैठक, सपा, बसपा अन् आपनं ठेवले अंतर

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिकाIndiaभारत