चीन उदार झाला, दान म्हणून ५ टक्क्यांचा डिस्काऊंट दिला...! भारतात टीव्ही, फ्रिज, मोबाईल स्वस्त होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 16:03 IST2025-04-10T15:59:12+5:302025-04-10T16:03:19+5:30

म्हणतात राजा उदार झाला आणि भोपळा दान दिला तसेच अगदी चीनने भारतासोबत केले आहे. ट्रेड वॉर सुरु होताच आता चीनच्या कंपन्या तळमळू लागल्या आहेत.

China became generous, gave a 5 percent discount as a donation...! TV, refrigerator, mobile will be cheaper in India | चीन उदार झाला, दान म्हणून ५ टक्क्यांचा डिस्काऊंट दिला...! भारतात टीव्ही, फ्रिज, मोबाईल स्वस्त होणार

चीन उदार झाला, दान म्हणून ५ टक्क्यांचा डिस्काऊंट दिला...! भारतात टीव्ही, फ्रिज, मोबाईल स्वस्त होणार

अमेरिकेने १२५ टक्के टेरिफ लावताच चीननेभारताला गोंजारायला सुरुवात केली आहे. लडाखवरून चीनभारताला गेल्या काही वर्षांपासून त्रास देत आहे. अरुणाचल प्रदेशपासून ते लडाखपर्यंत चीन भारतीय भूभागावर अतिक्रमण करत आहे. तसेच सीमेवर शस्त्रास्त्रांचा साठा करू लागला आहे. परंतू, अमेरिकेने ट्रेड वॉर सुरु केल्यानंतर लगेचच चीनने भारताला येरे माझ्या सोन्या, करत गोंजारायला सुरुवात केली आहे. 

म्हणतात राजा उदार झाला आणि भोपळा दान दिला तसेच अगदी चीनने भारतासोबत केले आहे. ट्रेड वॉर सुरु होताच आता चीनच्या कंपन्या तळमळू लागल्या आहेत. चिनी इलेक्ट्रॉनिक कंपोनंट कंपन्यांनी भारतीय कंपन्यांना पार्ट घेतले तर लगेचच ५ टक्के सूट देऊ केली आहे. आता भारतीय कंपन्या देखील ही संधी उचलण्याची शक्यता आहे. 

यामुळे येत्या काळात हा मिळत असलेला डिस्काऊंट बाराजात वस्तूंची मागणी वाढविण्यासाठी या कंपन्या ग्राहकांना देखील देण्याची शक्यता आहे. असे झाले तर भारतात टीव्ही, फ्रिज, स्मार्टफोन आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होऊ शकतात. ईटीने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

अमेरिकेत चीनमधून येणाऱ्या वस्तू महागणार आहेत. जवळपास याची किंमत दुप्पट होणार आहे. यामुळे मागणी कोसळणार आहे. मागणी कमी होणार असल्याने चिनी कंपोनंट बनविणाऱ्या कंपन्यांची झोप उडाली आहे. यामुळे या कंपन्या भारतीय कंपन्यांना डिस्काऊंट देऊ लागल्या आहेत. चीनवर १२५ टक्के टेरिफ लावल्याने १०० डॉलरची वस्तू आता अमेरिकेत २२५ डॉलर्सला मिळणार आहे. 

दरम्यान, ट्रम्प यांनी चीन सोडून अन्य देशांवर टेरिफ लावण्याचे ९० दिवसांसाठी रोखले आहे. चीनने जागतिक बाजारासाठी सन्मान दाखविला नाही. यामुळे त्यांच्यावर मी टेरिफ वाढवून १२५ टक्के करत आहे. अमेरिका आणि इतर देशांना लुटण्याचे दिवस गेले आहेत, हे चीन लवकरच समजेल असे आपल्याला वाटत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. 

Web Title: China became generous, gave a 5 percent discount as a donation...! TV, refrigerator, mobile will be cheaper in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.