रशियाची मोठी शक्ती इराण युद्धात उतरणार; अमेरिकेने जमिनीवरून हल्ला केल्यास 'चेचेन' सैन्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 15:48 IST2026-03-31T15:46:39+5:302026-03-31T15:48:04+5:30

Chechen forces Iran: अमेरिका-इराण युद्धात आता रशियाचे मित्र राष्ट्र असलेल्या चेचन्याची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने जमिनीवरून हल्ला केल्यास चेचन सैन्य इराणच्या बाजूने लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Chechen forces Iran War: 'Chechen' troops will land in Iran-US war; Russia's secret forces will come to help if America attacks from the ground | रशियाची मोठी शक्ती इराण युद्धात उतरणार; अमेरिकेने जमिनीवरून हल्ला केल्यास 'चेचेन' सैन्याची घोषणा

रशियाची मोठी शक्ती इराण युद्धात उतरणार; अमेरिकेने जमिनीवरून हल्ला केल्यास 'चेचेन' सैन्याची घोषणा

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता केवळ हवाई हल्ल्यांपुरता मर्यादित न राहता एका मोठ्या जागतिक युद्धाचे रूप घेताना दिसत आहे. या युद्धात आता रशियाचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि चेचेन्यांचे प्रमुख रमजान कादिरोव यांच्या 'चेचन' सैन्याची एन्ट्री होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चेचेन लष्करी तुकड्यांनी जाहीर केले आहे की, जर अमेरिकेने इराणवर जमिनीवरून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर ते इराणच्या सशस्त्र दलांच्या मदतीला धावून येतील. कादिरोव यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या या सैन्याने अमेरिका आणि इस्रायलविरुद्धच्या या युद्धाला 'धार्मिक युद्ध' म्हणजेच 'जिहाद' असे संबोधले आहे. त्यांच्या मते, ही लढाई 'चांगले विरुद्ध वाईट' अशी असून इस्लामिक प्रजासत्ताक इराणचे संरक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा आणि खर्चाचे गणित
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध लवकरात लवकर संपवण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी, अमेरिकेचा युद्धावरील खर्च ३५ अब्ज डॉलर्सच्या पुढे गेला आहे. ट्रम्प यांनी नुकतेच अरब देशांकडे या युद्धाच्या खर्चासाठी मदतीची मागणी केली आहे. मात्र, जर अमेरिकेने जमिनीवरून सैन्य उतरवण्याचा निर्णय घेतला, तर रशियाच्या पाठिंब्याने चेचन सैन्य मैदानात उतरल्यास परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते.

युद्धाचे ताजे अपडेट्स 
धार्मिक स्थळांवर हल्ले: इराणच्या झंजन शहरातील 'आजम हुसैनीया' या प्रसिद्ध धार्मिक केंद्रावर अमेरिका-इस्रायलने केलेल्या हल्ल्यात सोन्याच्या घुमटाचे नुकसान झाले आहे.

इराणची कडक नियमावली: इराणने आपल्या नागरिकांना चेतावणी दिली आहे की, कोणत्याही प्रकारची लष्करी माहिती किंवा फोटो शत्रू राष्ट्रांना दिल्यास थेट 'फाशीची शिक्षा' सुनावली जाईल.

कमांडरचा मृत्यू: इस्रायली हल्ल्यात गंभीर जखमी झालेले इराणचे नौसेना कमांडर अलीरेजा तंगसिरी यांचा मृत्यू झाला असून आज त्यांच्या अंत्ययात्रेसाठी मोठी गर्दी जमली होती.

चेचेन सैन्याच्या या भूमिकेमुळे आता रशिया या युद्धात थेट सामील होतो की काय, अशी भीती पाश्चात्य देशांना वाटू लागली आहे.

Web Title : ईरान युद्ध में रूस की शक्ति; चेचन सैनिकों की अमेरिका को धमकी।

Web Summary : अमेरिका द्वारा जमीनी आक्रमण करने पर रूस के चेचन सैनिक ईरान संघर्ष में शामिल होने की धमकी दे रहे हैं। वे इसे अमेरिका और इजराइल के खिलाफ 'धर्मयुद्ध' मानते हैं और ईरान की रक्षा करने की कसम खाते हैं। धार्मिक स्थलों पर हमलों और सख्त ईरानी नियमों से तनाव बढ़ गया है।

Web Title : Russia's force to join Iran war; Chechen troops threaten US.

Web Summary : Russia's Chechen forces threaten to enter the Iran conflict if the US launches a ground invasion. They consider it a 'holy war' against America and Israel, vowing to defend Iran. Tensions escalate with attacks on religious sites and strict Iranian rules.