Asteroid: पृथ्वीच्या बाजूने ताशी ३० हजार मैल वेगाने येतंय महासंकट, शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 14:57 IST2021-09-08T14:29:29+5:302021-09-08T14:57:48+5:30
Asteroid: या अॅस्ट्रॉईडचे नाव २०२१RE आहे. तो १० सप्टेंबर रोजी पृथ्वीपासून ३ लाख ४० हजार किमी अंतरावरून जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच पृथ्वी आणि चंद्रामध्ये असलेल्या अंतरा एवढ्या अंतरावरून जाणार आहे.

Asteroid: पृथ्वीच्या बाजूने ताशी ३० हजार मैल वेगाने येतंय महासंकट, शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा
वॉशिंग्टन - सुमारे ४५० फूल लांबीचा एक विशाल लघुग्रह (अॅस्ट्रॉइड) शुक्रवारी पृथ्वीच्या शेजारून जाण्याची शक्यता आहे. नासाच्या ट्रॅकिंग डेटामध्ये याची माहिती देण्यात आली आहे. या अॅस्ट्रॉईडचे नाव २०२१RE आहे. तो १० सप्टेंबर रोजी पृथ्वीपासून ३ लाख ४० हजार किमी अंतरावरून जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच पृथ्वी आणि चंद्रामध्ये असलेल्या अंतरा एवढ्या अंतरावरून जाणार आहे.
एका अंदाजानुसार २०२१RE पृथ्वीजवळून ताशी ३० हजार मैल वेगाने जाणार आहे. या वेगाने हा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास त्यामुले मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. अंतराळातून पृथ्वीवर दररोज १०० टन हून अधिक लहानमोठे दगड आणि अन्य ग्रहांचे तुकडे पडत असतात. मात्र मात्र एका लहान कारपेक्षा आकाराने लहान वस्तू जेव्हा पृथ्वीच्या वायूमंडळात प्रवेश करते तेव्हा ती जळून जाते. मात्र प्रत्येकवेळी अशा वस्तूंना धोका असे संबोधले जात नाही.
गेल्या महिन्यामध्ये पृथ्वीच्या दिशेने स्टॅच्यू ऑफ लिबर्टीपेक्षा तीन पट अधिक मोठा असलेला अॅस्ट्रॉईड वेगाने येत असल्याचे वृत्त आले होते. सप्टेंबरमध्ये हा अॅस्ट्रॉईड पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने सांगितले की, या अॅस्ट्रॉईडचे नाव २०२१NY1 असे आहे. हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळ येणाऱ्या वस्तूंपैकी एक आहे. नासाने सांगितले की, या अॅस्ट्रॉईडची लांबी ३०० मीटर आणि रूंदी १३० मीटरच्या आसपास आहे. तर स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हा केवळ ९३ मीटर उंच आहे.
हा २२ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. या महिन्याच्या सुरुवातीला नासाने सांगितले की, एका संशोधनामधून अॅस्ट्रॉइड बेन्नू हा २३०० पर्यंत कधीही पृथ्वीवर आदळू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अॅस्ट्रॉईड्स म्हणजे असे दगड असतात, जे अन्य कुठल्याही ग्रहाप्रमाणे सूर्याभोवती फिरत असतात. मात्र ते आकाराने खूप लहान असतात. आपल्या सूर्यमालेतील बहुतांश लघुग्रह हे मंगळ आणि गुरू या ग्रहांच्या मधल्या पट्ट्यामध्ये आहेत.