शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
7
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
8
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
9
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
10
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
11
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
12
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
13
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
14
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
15
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
16
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
17
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
18
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
19
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
20
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
Daily Top 2Weekly Top 5

इसिसने जॉर्डनच्या वैमानिकाला जिवंत जाळले?

By admin | Updated: February 4, 2015 10:56 IST

इसिस या दहशतवादी संघटनेने त्यांच्या ताब्यातील जॉर्डनच्या वैमानिकाला जिवंत जाळले आहे.

ऑनलाइन लोकमत
अम्मान, दि. ४ - इसिस या दहशतवादी संघटनेने त्यांच्या ताब्यातील जॉर्डनच्या वैमानिकाला जिवंत जाळले आहे. यासंबंधी  मंगळवारी एक व्हिडिओ ऑनलाइन प्रसारित करण्यात आला असला तरीही त्या व्हिडीओची सत्यता अद्याप पडताळून पाहिली जात आहे. अवघ्या काही दिवासांपूर्वीच इसिसने जपानच्या दोन्ही ओलिसांचा शिरच्छेद करत तशी चित्रफीत जारी केली होती. त्यानंतर त्यांनी आता जॉर्डनच्या नागरिकाचा बळी घेतला आहे. 
मोएथ अल-कसाबेह असे त्या वैमानिकाचे नाव असून ट्विटरवर हा व्हिडीओ टाकण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये मोएथ एका पिंज-यात उभा असल्याचे दिसत आहे. त्यानंतर त्याला जाळण्यात आले.
अमेरिकेच्या नेतृत्वाखाली लढणा-या सेनेच्या मदतीसाठी जाणा-या मोएथचे विमान दुर्घटनाग्रस्त होऊन सीरियामधील रक्का येथे पडले आणि तो इसिसचा बंदी बनला. मोएथच्या मृत्यूचे वृत्त खरे असल्याचे जॉर्डनच्या सरकारी वृत्तवाहिनीने म्हटले असून महिन्याभरापूर्वी त्याची हत्या झाल्याचेही त्यात नमूद करण्यात आले. मोझच्या सुटकेसाठी  इसिसने जॉर्डनच्या ताब्यातील दहशतवाद्यांची सुटका करावी अशी मागणी केली होती.
 
जॉर्डननने दिली दोन दहशतवाद्यांना फाशी
इसिसने वैमानिकाची हत्या केल्यानंतर जॉर्डन सरकारने एका महिलेसह दोन जणांना फासावर लटकवलं. साजिदा अल रिशवी आणि जियाद अल करबूली अशी त्या दोघांची नावे असून आज सकाळी त्यांनी फाशी देण्यात आल्याची माहिती सरकारी प्रवक्त्यांनी दिली. २००५ साली जॉर्डनची राजधानी अम्मान येथे तीन हॉटेल्समध्ये झालेल्या स्फोटांप्रकरणी अल रिशवीला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. या स्फोटांत अनेक निरपराध नागरिक ठार झाले होते.