ब्रसेल्स : ‘इसिस’ने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर गेले १२ दिवस बंद असलेले ब्रसेल्सचे विमानतळ रविवारी अंशत: सुरू करण्यात आले. त्यानंतर अथेन्स, ट्युरिन आणि फेरो येथे तीन विमाने रवाना झाली.अर्थात हे विमानतळ ‘सांकेतिकरीत्या’ खुले करण्यात आले असून, प्रवाशांची कडक झडती घेतली जात आहे. २२ मार्च रोजी दोन इसमांनी आत्मघातकी बॉम्बस्फोट घडविला होता. तेव्हापासून हे विमानतळ बंद ठेवण्यात आले होते. त्याच दिवशी मेट्रो स्टेशनवरही बॉम्बस्फोट झाला होता. या दोन्ही हल्ल्यात एकूण ३२ जण ठार आणि अन्य ३०० जण जखमी झाले होते.
ब्रसेल्स विमानतळ १२ दिवसांनंतर सुरू
By admin | Updated: April 4, 2016 02:45 IST