ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांची खुर्ची धोक्यात! एपस्टीनच्या मित्राला राजदूत नेमल्याने मागावी लागली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 23:37 IST2026-02-05T23:34:39+5:302026-02-05T23:37:04+5:30

ब्रिटनचे पंतप्रधान सर कीर स्टारमर सध्या आपल्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठ्या संकटात सापडले आहेत.

British Prime Minister Keir Starmer's seat in danger! He had to apologize for appointing Epstein's friend as ambassador | ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांची खुर्ची धोक्यात! एपस्टीनच्या मित्राला राजदूत नेमल्याने मागावी लागली माफी

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांची खुर्ची धोक्यात! एपस्टीनच्या मित्राला राजदूत नेमल्याने मागावी लागली माफी

ब्रिटनचे पंतप्रधान सर कीर स्टारमर सध्या आपल्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठ्या संकटात सापडले आहेत. अमेरिकेतील कुख्यात गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्याशी जवळीक असलेल्या पीटर मंडेलसन यांना अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्त करणे ही आपली मोठी चूक होती, अशी कबुली खुद्द स्टारमर यांनी दिली आहे. या प्रकरणावरून संसदेत गदारोळ माजला असून स्टारमर यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

नेमकं प्रकरण काय?

लेबर पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि लॉर्ड पीटर मंडेलसन यांची गेल्या वर्षी अमेरिकेत ब्रिटनचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, अलिकडेच समोर आलेल्या पुराव्यांनुसार, मंडेलसन यांचे संबंध कुख्यात अपराधी जेफ्री एपस्टीनशी असल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एपस्टीनवर गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतरही ही मैत्री कायम होती. या खुलाशामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

स्टारमर यांची जाहीर माफी 

"मी मंडेलसन यांच्या खोटेपणावर विश्वास ठेवला आणि ही माझी सर्वात मोठी चूक ठरली," अशा शब्दांत पंतप्रधान कीर स्टारमर यांनी आपली चूक मान्य केली आहे. एपस्टीनच्या पीडितांची माफी मागताना स्टारमर म्हणाले की, "सामर्थ्यवान लोकांनी पीडितांवर अन्याय केला आहे. मला या मैत्रीच्या खोलीचा अंदाज नव्हता." मात्र, स्टारमर यांना आधीच या संबंधांची कल्पना होती, असा दावा विरोधकांनी केल्याने पेच वाढला आहे.

सरकारवर गंभीर आरोप आणि पोलिसांचा ससेमिरा 

केवळ मैत्रीच नाही, तर मंडेलसन यांनी मंत्री असताना एपस्टीनला काही संवेदनशील सरकारी माहिती पुरवल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास आता पोलीस करत आहेत. या संवेदनशील प्रकरणात सरकारने कागदपत्रे लपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. यामुळे पंतप्रधान कार्यालयाची प्रतिमा मलिन झाली आहे.

लेबर पार्टीत बंडाची ठिणगी? 

या वादामुळे स्टारमर यांच्या स्वतःच्या पक्षातही फूट पडल्याचे दिसत आहे. उपपंतप्रधान एंजेला रेयनर यांच्या नेतृत्वाखाली अनेक खासदारांनी स्टारमर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. "पंतप्रधानांचे नेतृत्व कमकुवत झाले असून त्यांची विश्वासार्हता संपली आहे," अशी चर्चा लेबर पार्टीच्या अंतर्गत वर्तुळात सुरू आहे.

Web Title : एपस्टीन के मित्र को राजदूत बनाने पर स्टारमर की कुर्सी खतरे में!

Web Summary : एपस्टीन के सहयोगी को राजदूत बनाने पर पीएम स्टारमर संकट में। इस्तीफे की मांग के बीच उन्होंने माफी मांगी। विपक्ष ने कवर-अप का आरोप लगाया, जिससे पार्टी में फूट और पुलिस जांच शुरू हो गई।

Web Title : UK PM Starmer's position threatened after Epstein friend appointment sparks outrage.

Web Summary : PM Starmer faces crisis for appointing Epstein associate as ambassador. He apologized, admitting his error amid uproar and resignation calls. Opposition alleges cover-up and questions Starmer's credibility, fueling internal party divisions and police investigation.