भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:27 IST2025-10-08T11:27:33+5:302025-10-08T11:27:53+5:30
महत्वाचे म्हणजे, जुलै २०२५ मध्येच भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार (FTA) झाला आहे. स्टार्मर यांचा हा दौरा दोन्ही देशांतील आर्थिक भागीदारीला अधिक बळ देणारा ठरेल.

भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
नवी दिल्ली: ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे बुधवार (८ ऑक्टोबर २०२५) दोन दिवसीय भारत दौऱ्यासाठी आगमन झाले. त्यांच्या आगमनापूर्वीच, ब्रिटिश एअरवेजच्या मुंबईला जाणाऱ्या '९१००' या विमानात त्यांनी प्रवाशांशी साधलेला मजेशीर संवाद इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे. महत्वाचे म्हणजे, हा व्हिडिओ त्यांनी स्वतःच शेअर केला आहे.
'कॉकपिटमध्ये तुमचे पंतप्रधान आहेत...' -
विमानातील प्रवाशांना अभिवादन करताना स्टार्मर मिश्किलपणे म्हणाले, "कॉकपिटमध्ये तुमचे पंतप्रधान आहेत. नाही, ही हवाई सुरक्षेशी संबंधित कोणतीही घोषणा नाही." खरे तर, लंडनला नवी दिल्लीसोबत अपेक्षित असलेल्या प्रमुख आर्थिक भागीदारीची ही प्रतीकात्मक सुरुवात होती.
१२५ हून अधिक व्यावसायिक आणि अधिकारी स्टार्मर यांच्यासोबत -
महत्वाचे म्हणजे, स्टार्मर हे भारतातीलइंग्लंडच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या ट्रेड मिशनचे संचालन करत आहेत. आपल्या सर्वांचे आमच्यासोबत असणे खरोखरच खूपच छान आहे. मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. कारण आम्ही आपल्या मुक्त व्यापर करारात सर्व संधींची माहिती करून घेत आहोत. स्टार्मर यांच्यासोबत १२५ हून अधिक व्यावसायिक आणि अधिकारीही आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून स्टार्मर भारत दौऱ्यावर -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून स्टार्मर भारत दौऱ्यावर आले आहेत. या भेटीदरम्यान दोन्ही नेते 'व्हिजन २०३५' च्या अनुषंगाने भारत-ब्रिटन व्यापक रणनीतिक भागीदारीच्या (Comprehensive Strategic Partnership) सर्व पैलूंमधील प्रगतीचा आढावा घेणार आहेत. महत्वाचे म्हणजे, जुलै २०२५ मध्येच भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार (FTA) झाला आहे. स्टार्मर यांचा हा दौरा दोन्ही देशांतील आर्थिक भागीदारीला अधिक बळ देणारा ठरेल.