शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ब्राझीलमध्ये X वर बंदी, इलॉन मस्क यांना मोठा झटका; न्यायाधिशांनी आयुष्यभर लक्षात राहील असा निर्णय दिला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 11:17 IST

टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक मस्क यांनी संतापाच्या भरात प्रतिक्रिया देत, मॉरीस यांना “न्यायाधीश म्हणून काम करणारा एक दुष्ट हुकूमशहा”, असे संबोधले आहे.

जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले इलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कारण, ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जस्टिस मॉरिस यांनी मस्क यांची सोशल मीडिया दिग्गज कंपनी एक्स (X) ला ब्राझीलमध्ये सस्पेंड करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी देण्यात आलेल्या या निर्णयाने दोन व्यक्तींमधील अभिव्यक्ती स्वतंत्र्य आणि चुकीच्या माहितीवरून गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला वाद आता आणखी वाढला आहे.

तत्पूर्वी, जस्टिस मॉरिस यांनी, आपण ब्राझीलमध्ये आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी 24 तासांच्या आत स्थानिक प्रतिनिधीची नियुक्ती केली नाही तर, आपली सर्व्हिस सस्पेंड करण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्यानंतर आता हा निर्णय समोर आला आहे. या निर्णयानंतर मस्क यांनी आदेश देणाऱ्या न्यायाधीशांवर निशाणा साधला आहे.

मस्क भडकले...!टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक मस्क यांनी संतापाच्या भरात प्रतिक्रिया देत, मॉरीस यांना “न्यायाधीश म्हणून काम करणारा एक दुष्ट हुकूमशहा”, असे संबोधले आहे आणि त्यांच्यावर “ब्राझीलमधील लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न” केल्याचा आरोपही केला आहे. मस्क यांनी एक्सवर लिहिले आहे, “स्वतंत्र अभिव्यक्ती हा लोकशाहीचा पाया आहे आणि ब्राझीलमध्ये एक निवडून न आलेला न्यायाधीश राजकीय हेतूने याचा नाश करत आहे.”

असं आहे संपूर्ण प्रकरण - महत्वाचे म्हणजे, हे प्रकरण एप्रिल महिन्यापासून सुरू झाले होते. तेव्हा मॉरिस यांनी 'एक्स'संदर्भात चौकशीचे आदेश दिले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चुकीची माहिती पसरवणाऱ्या अनेक अकाउंट्सचा प्रचार केल्याचा आरोप त्यांनी केला होता. सुरुवातीला, X च्या टीमने ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत अनेक अकाउंट ब्लॉक केले होते. मात्र, अकाउंट ब्लॉक करणाऱ्या टीमने ती का ब्लॉक केली? ते सरकारच्या कोणत्या कायद्याचे उल्लंघन करतात? हे सांगितले नाही. ब्राझील हे एक्ससाठी एक महत्वाचे मार्केट आहे. 

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTwitterट्विटरBrazilब्राझीलSocial Mediaसोशल मीडिया