भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 07:27 IST2025-10-29T07:26:55+5:302025-10-29T07:27:35+5:30
ब्राझीलमधील रियो डी जेनेरियोमध्ये पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत तब्बल ६४ जणांचा मृत्यू झाला आहे.

भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
ब्राझीलमधील रियो डी जेनेरियोमध्ये पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत तब्बल ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रियो डी जेनेरियोमध्ये जवळपास २,५०० ब्राझिलियन पोलीस आणि सैनिकांनी ड्रग्ज तस्करी करणाऱ्या गँगवर छापा टाकला आणि ८१ जणांना अटक केली. त्यानंतर झालेल्या गोळीबारात किमान ६० जणांचा आणि चार पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. या कारवाईत एकूण ६४ जणांचा मृत्यू झाला.
रिओ राज्य सरकारच्या मते, ही कारवाई एका वर्षाहून अधिक काळापासून नियोजित होती आणि त्यात २,५०० हून अधिक लष्करी आणि नागरी पोलीस अधिकारी सहभागी होते. सुरक्षा दलांनी गँगच्या नियंत्रणाखाली असलेल्या अनेक भागांना वेढा घातला आणि आत घुसले, ज्यामुळे गोळीबार सुरू झाला. ६४ लोकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी कमीतकमी ८१ जणांना अटक केली आहे.
At least 64 killed, including 4 police officers in massive Rio de Janeiro police raid
— ANI Digital (@ani_digital) October 28, 2025
Read @ANI Story | https://t.co/QltKiiHg9F#Brazil#RiodeJaneiro#PoliceRaidpic.twitter.com/N6sJwRQCqw
सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कारवाई सुरू असल्यामुळे मृतांची संख्या वाढू शकते. सीएनएनच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांनी कारवाईदरम्यान ४२ रायफल देखील जप्त केल्या. राज्य सरकारने म्हटलं आहे की, गँगच्या सदस्यांनी प्रत्युत्तर म्हणून पोलिसांना टार्गेट करण्यासाठी ड्रोनचा वापर केल्याचा आरोप आहे. पेन्हा कॉम्प्लेक्समध्ये पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी गुन्हेगारांनी ड्रोनचा वापर केला.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाने रियो डी जेनेरियोमधील ड्रग्ज तस्करांवर पोलिसांच्या छाप्याचं वर्णन भयानक असं केलं. रियो डी जेनेरियोमधील एका फावेला येथे सुरू असलेल्या पोलीस कारवाईमुळे आम्ही घाबरलो आहोत, ज्यामध्ये चार पोलीस अधिकाऱ्यांसह ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. आम्ही अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्यांतर्गत त्यांच्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतो आणि त्वरित आणि प्रभावी चौकशीची विनंती करतो असंही त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.