शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

भुताला पाहण्यासाठी भुतबंगल्यात गेला, पण असा विचित्र प्रकारे मृत्यू झाला की डॉक्टरही झाले शॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 4:51 PM

प्रत्यक्षात भूतही नसतं आणि एखादं ठिकाणंही भूतांचं नसतं. १६ वर्षाच्या एक मुलगाही हेच सगळं मानायचा मात्र जेव्हा तो एका भीतीदायक घरात गेला तेव्हा त्याच्यासोबत भलतंच काहीतरी घडलं. सध्या मलेशियामध्ये ही घटना चांगलीच चर्चेत आहे.

भूताचं अस्तित्व आणि त्याच्याबद्दलच्या गोष्टी (Ghost Stories) हा केवळ आपल्या मनाचा भ्रम असल्याचं म्हटलं जातं. प्रत्यक्षात भूतही नसतं आणि एखादं ठिकाणंही भूतांचं नसतं. १६ वर्षाच्या एक मुलगाही हेच सगळं मानायचा मात्र जेव्हा तो एका भीतीदायक घरात गेला तेव्हा त्याच्यासोबत भलतंच काहीतरी घडलं. सध्या मलेशियामध्ये ही घटना चांगलीच चर्चेत आहे.

हा मुलगा आपला मित्र आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत प्रसिद्ध ठिकाणी फिरण्यासाठी (Haunted Tourists Attraction) गेला होता. स्थानिक लोकांनी भूताची जागा म्हणून घोषित केलेल्या एका इमारतीत तो आपल्या मित्रासोबत गेला (Haunted Places). मात्र, काहीच वेळात त्याच्यासोबत अजब घटना घडली आणि या इमारतीत घडलेल्या भीतीदायक घटनांमध्ये आणखी एक भर पडली.

ही घटना मलेशियाच्या बेनटॉन्गची आहे, जी पेहांग स्टेटमध्ये येते. इथे एक १६ वर्षाचा मुलगा आपल्या मित्रांसोबत आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत फिरण्यासाठी गेला होता. Kosmo च्या म्हणण्यानुसार, १ डिसेंबरला या मुलाने या भीतीदायक घरात आपल्या मित्रासह प्रवेश केला. Daily Star च्या रिपोर्टनुसार, हा मुलगा इमारतीच्या जवळ जाताच त्याची तब्येत खराब होऊ लागली. त्याला बरं वाटत नव्हतं आणि हळूहळू तो जमिनीवर कोसळला. त्याचं तोंड आणि शरीर पिवळं पडलं होतं. त्याला लगेचच इमारतीतून बाहेर आणण्यात आलं मात्र तो काहीही प्रतिसाद देत नव्हता. अखेर डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं (Boy Died after going in Haunted House), यानंतर त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली.

अधिकृत वक्तव्यात या मुलाचा मृत्यू कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे झाल्याचं सांगण्यात येत आहे. क्लीवलँड क्लिनिक मेडिकल सेंटरच्या म्हणण्यानुसार, अनेकदा माणूस खूप जास्त घाबरल्यास असं होतं. मात्र, हे सामान्य नाही. बहुतेक शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की केवळ भीती वाटल्यामुळे माणसाचा मृत्यू होणं असाधारण आहे. या केसमध्ये या मुलाची इतर कोणतीही मेडिकल हिस्ट्री नव्हती. अशात त्याचा अचानक मृत्यू झाल्याने लोकांच्या मनात या जागेबद्दल आणखीच प्रश्न निर्माण झाले आहेत.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेDeathमृत्यूHeart Attackहृदयविकाराचा झटका