सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 12:03 IST2025-12-15T12:02:47+5:302025-12-15T12:03:52+5:30
१० वर्षांपूर्वी सीरियातून ऑस्ट्रेलियात आलेल्या अहमद अल अहमदने आपल्या जीवाची पर्वा न करता एका दहशतवाद्याला आव्हान दिलं.

फोटो - आजतक
ऑस्ट्रेलियाच्या सिडनीतील बॉन्डी बीचवर सर्व काही सामान्य होतं. यहूदी समुदायाचे लोक 'हनुक्का' हा उत्सव साजरा करत होते. बॉन्डी बीचवर संगीत, नृत्य आणि उत्साहाचं वातावरण होते. याच दरम्यान तिथे अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यामध्ये १६ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमद अल अहमद आणि त्याचा चुलत भाऊ जॉजे अल्कांज हे दोघेही तिथे फिरत होते.
१० वर्षांपूर्वी सीरियातून ऑस्ट्रेलियात आलेल्या अहमद अल अहमदने आपल्या जीवाची पर्वा न करता एका दहशतवाद्याला आव्हान दिलं आणि त्याच्यावर झेप घेऊन त्याची बंदूक हिसकावून घेतली. अल्कांजने दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही फिरत-फिरत कार्सच्या मागे गेलो. तेव्हा गोळ्यांचे आवाज ऐकू आले. आम्ही पाहिलं की दोन लोक आमच्या खूप जवळ गोळीबार करत होते. अचानक झालेला गोळीबार पाहून आम्ही खूप घाबरलो होतो."
🙏🏼 for the Muslim hero that disarmed one of the terrorists in Australia his name is Ahmed Al Ahmed.
— Love Majewski✝️🇺🇸 (@lovemajewski1) December 14, 2025
He is 43 years old, a fruit shop owner and a father of two.
Ahmad himself was shot twice during the attack, but he is in a stable condition, he is expected to undergo surgery.… pic.twitter.com/qGsaSrCZGC
"माझ्या कुटुंबाची काळजी घ्या"
अहमद अल अहमद म्हणाला, "मी आता मरणार आहे, कृपया माझ्या कुटुंबाची काळजी घ्या आणि त्यांना सांगा की मी लोकांचा जीव वाचवण्यासाठी पुढे सरसावलो." अहमद कार पार्कवरून बंदूकधाऱ्याच्या दिशेने पुढे सरकला. उभ्या असलेल्या कारच्या मागे लपून तो शूटरच्या शक्य तितका जवळ गेला. जसा तो जवळ पोहोचला, अहमदने त्या दहशतवाद्यावर झेप घेतली. त्याच्या हातातून बंदूक हिसकावून घेऊन त्याला खाली पाडलं.
अहमदला लागल्या दोन गोळ्या
बंदूकधारी जमिनीवर मागे पडला. अहमदने रायफल उचलली आणि त्याच्यावर नेम साधला. याच दरम्यान अहमदला दोन गोळ्या लागल्या. सध्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्यावर सर्जरी करण्यात आली आहे. अहमदच्या वडिलांनी आपला मुलगा हिरो असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्याची प्रकृती आता बरी असल्याचं देखील सांगितलं.