शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

१८१ प्रवाशांचे मृतदेह सापडले

By admin | Updated: July 18, 2014 23:04 IST

अ‍ॅमस्टरडमहून क्वालालंपूरकडे जाणारे मलेशियन एअरलाईन्सचे एमएच- १७ हे विमान गुरुवारी रात्री रशियाच्या सीमेलगत युक्रेनमध्ये कोसळले होते

क्वालालंपूर/ कीव : दुर्घटनाग्रस्त मलेशियन एअरलाईन्सच्या विमानाच्या अवशेषातून १८१ प्रवाशांचे मृतदेह हाती लागले असून रशियनसमर्थक युक्रेनच्या बंडखोरांनी दुर्घटनास्थळी या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडल्याचा दावा केला आहे. आकाशातून आग ओकत हे विमान कोसळले. या दुर्घटनेने मलेशियासोबत अवघे जग हादरले. निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा ठोठावली जावी, अशी मागणी मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजाक यांनी केली आहे.अ‍ॅमस्टरडमहून क्वालालंपूरकडे जाणारे मलेशियन एअरलाईन्सचे एमएच- १७ हे विमान गुरुवारी रात्री रशियाच्या सीमेलगत युक्रेनमध्ये कोसळले होते. या भीषण दुर्घटनेत विमानातील सर्व २९८ प्रवासी ठार झाले. रडारवरून दिसेनासे झाल्यानंतर हे विमान रशियनसमर्थक युक्रेनी बंडखोराचा कब्जा असलेल्या शाकर्तास्क शहरालगत कोसळले. या विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी मॉस्कोला पाठविण्याबाबत रशियासमर्थक बंडखोर विचार करीत आहेत. पूर्व युक्रेनच्या अत्यंत दुर्गम भागात हे विमान १० हजार मीटर उंचीवरून कोसळले. ज्या ठिकाणी हे विमान कोसळले, त्या भागातील विस्तीर्ण शेतीत या विमानाचे अवेशष जागोजागी विखुरले होते. या अवशेषात छिन्न-विच्छिन्न, तर काही जळून खाक झालेल्या स्थितीत १८१ मृतदेह आढळले. ओळख पटविण्यासाठी हे मृतदेह खारकीव येथे नेण्यात येणार आहेत. दुर्घटनास्थळाच्या उत्तरेला २७० किलोमीटर अंतरावर खारकीव शहर आहे. युक्रेन सरकार व रशियनसमर्थक बंडखोर या दुर्घटनेबद्दल एक दुसऱ्यांना जबाबदार ठरवीत आहेत.