शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
14
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
15
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
16
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
17
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
18
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
19
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
20
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई

डोनाल्ड ट्रम्प यांना तगडा झटका; TikTok वरील बॅन न्यायालयाने हटविला

By हेमंत बावकर | Published: September 28, 2020 9:48 AM

अमेरिकेमध्ये 19 सप्टेंबरपासून Tiktok, We Chat वर बंदी लादण्यात आली होती. टिकटॉकचे अमेरिकेत 10 कोटी वापरकर्ते आहेत.

वॉशिंग्टन : भारताने दणका दिल्यानंतर अमेरिकेनेही चिनी अ‍ॅप Tiktok, We Chat वर बंदी घातली होती. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला तेथील संघीय न्यायालयाने धक्का दिला असून ही बंदी स्थगित केली आहे. 

चीनला तगडा झटका! PUBG, TikTok बॅनमुळे तब्बल 1.46 लाख कोटी बुडाले

अमेरिकेमध्ये 19 सप्टेंबरपासून Tiktok, We Chat वर बंदी लादण्यात आली होती. टिकटॉकचे अमेरिकेत 10 कोटी वापरकर्ते आहेत. अमेरिका संघराज्यांच्या न्यायाधिशांनी मध्यरात्रीपासून (Tiktok banned in US) ट्रम्प यांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. मात्र, नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या एक आठवड्यानंतर ही बंदी पुन्हा सुरु होणार आहे. अमेरिकेच्या कोलंबिया न्यायालयाचे न्यायाधीश कार्ल निकोलस यांनी नोव्हेंबरमध्ये लागू होणाऱ्या या बंदीवर मात्र स्थगिती देण्य़ास नकार दिला आहे. 

TikTok चे सीईओ केविन मेयर यांचा राजीनामा; अमेरिकेचा मोठा दबाव

निकोलस यांच्या खंडपीठासमोर रविवारी सकाळी आपत्कालीन सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीवेळी टिकटॉकच्या वकिलांनी कंपनीच्या आणि नागरिकांच्या संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याची बाजू मांडली होती. तसेच व्यवसायही प्रभावित होणार असल्य़ाचे म्हटले होते. जज यांनी यावर निर्णय जाहीर केला असला तरीही त्यामागचे कारण त्यांनी स्पष्ट केलेल नाही. 

ट्रम्प यांची दुटप्पी भूमिका?याबाबत ट्रम्प यांनीच सांगितले होते. टिकटॉकबाबत निर्णय घेण्यासाठी वॉलमार्ट आणि ओरॅकलच्या प्रतिनिधींशी चर्चा करत असल्याचे म्हटले होते. गेल्या महिन्यातच ट्रम्प यांनी या अ‍ॅपवर बंधने आणण्यासाठी आदेशावर सह्या केल्या होत्या. यामध्ये या अ‍ॅपच्या कंपन्या अमेरिकेतील व्यवसाय स्थानिक कंपन्य़ांना देऊ शकतात असे म्हटले होते. यावेळी  मायक्रोसॉफ्ट टिकटॉकसोबत चर्चा करत होता, असे सांगितले जात होते. महत्वाचे म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हा आदेश रविवारपर्यंत मागेही घेण्याची शक्यता होती. कारण टिकटॉकची कंपनी बाईट डान्स अमेरिकेच्या सरकारसोबत तेथीलच कंपन्यांना टिकटॉक विकण्याबाबत बोलत आहेत. यावर सरकारही गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाCourtन्यायालय