अबब...दिवसाला 140 लीटर दूध देणाऱ्या गाईंचा जन्म; चीनच्या क्लोनिंग तंत्राची किमया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 10:40 AM2023-02-06T10:40:23+5:302023-02-06T10:41:13+5:30

या तीन गायींची ब्रिडिंग नॉर्थवेस्ट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केली आहे. गेल्या दोन महिन्यांत या गायींचा जन्म झाला आहे. त्या नेदरलँड येथील होलस्टिन फ्रिसियन गायीच्या क्लोन आहेत. 

birth of cows that give 140 liters of milk a day | अबब...दिवसाला 140 लीटर दूध देणाऱ्या गाईंचा जन्म; चीनच्या क्लोनिंग तंत्राची किमया

अबब...दिवसाला 140 लीटर दूध देणाऱ्या गाईंचा जन्म; चीनच्या क्लोनिंग तंत्राची किमया

Next

बीजिंग : चीनमध्ये क्लोनिंग तंत्राद्वारे तीन आगळ्या गायींचा जन्म झाला आहे. त्यातील प्रत्येक गाय दिवसाला १४० लीटर दूध देईल. या गायी त्यांच्या आयुष्यभरात १०० टन म्हणजे २ लाख ८३ हजार लीटर दूध देतील, असा चिनी शास्त्रज्ञांचा दावा आहे. येत्या दोन वर्षांत अशा सुमारे हजार गायी जन्माला घालण्यासाठी त्या देशात प्रयोग सुरू आहेत. 

या तीन गायींची ब्रिडिंग नॉर्थवेस्ट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केली आहे. गेल्या दोन महिन्यांत या गायींचा जन्म झाला आहे. त्या नेदरलँड येथील होलस्टिन फ्रिसियन गायीच्या क्लोन आहेत. 

दुग्धोत्पादन क्षेत्राला फायदा
- एक क्लोन गाय दरवर्षी १८ टन (१६.३ हजार लिटर) दूध देऊ शकेल. 
- अमेरिकेतील गायीच्या तुलनेत ही गाय १.७ पट अधिक दूध देईल. या चिनी गायींमुळे दुग्धोत्पादन क्षेत्राचा मोठा फायदा होणार असल्याचा दावा त्या देशाने केला आहे. 
- सध्या चीनमध्ये दर दहा हजार गायींपैकी फक्त ५ गायी आयुष्यभरात १०० टन दूध देतात. 

याआधी आर्क्टिक लांडगा...
चीनमध्ये प्राण्याचे क्लोन बनवण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्यावर्षी चीनमध्ये जगातील पहिला क्लोन आर्क्टिक लांडगा जन्माला आला होता. २०१७ साली क्षयरोगावर मात करू शकणाऱ्या गुरांचे क्लोनही केले होते.

कानातील पेशींपासून तयार केले भ्रूण -
प्रमुख शास्त्रज्ञ जिन यापिंग यांनी सांगितले की, सर्वांत चांगल्या प्रजातीच्या गायींच्या कानातील पेशी पेशींपासून भ्रूण तयार करून त्यांचे १२० गायींमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले. त्यातील ४२ टक्के गायी गर्भवती राहिल्या.

कोणताही लैंगिक संबंध प्रस्थापित न करता एका जिवापासून दुसरा जीव जन्माला घालण्याच्या प्रक्रियेला क्लोनिंग असे म्हणतात. नेमका हाच प्रयोग चीनमधील तीन क्लोन गायींबाबत करण्यात आला.

Web Title: birth of cows that give 140 liters of milk a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.