पक्ष्यांनाही होते जांभईची लागण

By Admin | Updated: May 30, 2015 23:34 IST2015-05-30T23:34:34+5:302015-05-30T23:34:34+5:30

एका व्यक्तीला जांभई आली की तिची लागण होऊन दुसऱ्यालाही जांभई येते हे आपल्याला माहिती आहे; परंतु अशी जांभईची लागण फक्त सस्तन प्राण्यांमध्येच होते असे नाही,

The birds also had jambhai infection | पक्ष्यांनाही होते जांभईची लागण

पक्ष्यांनाही होते जांभईची लागण

न्यूयॉर्क : एका व्यक्तीला जांभई आली की तिची लागण होऊन दुसऱ्यालाही जांभई येते हे आपल्याला माहिती आहे; परंतु अशी जांभईची लागण फक्त सस्तन प्राण्यांमध्येच होते असे नाही, तर पक्ष्यांच्या काही जातींमध्येही ती पसरते, असे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे.
यापूर्वी जांभईची लागण मानव, पाळलेली कुत्री, चिंपांझी, उंदीर, घूस व सशासारख्या सस्तन जिवांनाच होते असे समजले जात होते. सस्तनेतर जिवांमध्येही जांभईची लागण होते याचा पहिला पुराव्यासह प्रयोग करण्यात आला, असे स्टेट युनिव्हर्सिटी आॅफ न्यूयॉर्कच्या या अभ्यासाचे नेते अँड्र्यू गॅलप यांनी सांगितले. असाच प्रयोग याआधी पाळलेल्या छोट्या हिरव्या आॅस्ट्रेलियन पोपटांच्या थव्यावर पण करण्यात आला होता.
गॅलप यांनी १६ पक्ष्यांना जोडीजोडीने जवळजवळच्या पिंजऱ्यात ठेवले. ते एकमेकांना पाहू शकतील व एकमेकांना दिसणार नाहीत अशा दोन्ही अवस्थेत त्यांना ठेवले होते. पक्षी एकमेकांना पाहू शकतात तेव्हा ते जांभई देतात. दुसऱ्या प्रयोगात त्यांना हे छोटे हिरवे आॅस्ट्रेलियन पोपट जांभई देताना व जांभई न देतानाचा पाच मिनिटांचा व्हिडिओ दाखविण्यात आला. तेव्हा पक्षी एकमेकांना पाहू शकत नव्हते त्या तुलनेत ते एकमेकांना पाहू शकत होते त्यावेळी त्यांनी त्या पाच मिनिटांत तीन वेळा जांभई दिली. या जांभया म्हणजे ते पक्षी काळजीत होते किंवा तणावात होते म्हणून नव्हत्या. जांभईचा हा प्रतिसाद एकमेकांच्या भावना जाणून घेण्याचा होता, असे गॅलप यांनी सांगितले.

Web Title: The birds also had jambhai infection