ओसामापुत्राचा 9/11हल्ल्यातील मुख्य सूत्रधाराच्या मुलीशी विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 16:01 IST2018-08-06T16:01:42+5:302018-08-06T16:01:45+5:30

ओसामाच्या मुलाचे नाव हामजा बिन लादेन असे असून त्याने मोहम्मद अट्टाच्या मुलीशी विवाह केला आहे.

Bin Laden's Son Marries 9/11 Hijacker's Daughter, Says Family | ओसामापुत्राचा 9/11हल्ल्यातील मुख्य सूत्रधाराच्या मुलीशी विवाह

ओसामापुत्राचा 9/11हल्ल्यातील मुख्य सूत्रधाराच्या मुलीशी विवाह

लंडन- संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या दहशतवादीओसामा बिन लादेनच्या मुलाने न्यू यॉर्क येथिल वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या मुलीशी विवाह केला आहे. ओसामाच्या मुलाचे नाव हामजा बिन लादेन असे असून त्याने मोहम्मद अट्टाच्या मुलीशी विवाह केला आहे. मोहम्मद अट्टा याने विमाने अपहरण करुन न्यू यॉर्कमध्ये हल्ला करण्याची योजना आखली होती. ओसामाचे सावत्र भाऊ अहमद आणि हसन यांनी असा विवाह झाल्याची माहिती एका दैनिकाला मुलाखत देताना स्पष्ट केले.



हामजाने मोहम्मद अट्टाच्या मुलीशी विवाह केला आहे असं आम्ही ऐकलं आहे, मात्र ते कोठे आहेत हे आम्हाला माहिती नाही. ते अफगाणिस्तानात असावेत असे अहमदने मुलाखतीत सांगितले. त्याचप्रमाणे हामजाला अल कायदा दहशतवादी संघटनेत वरचे पद मिळाले असावे असेही त्याचे मत आहे. 2 मे 2011 रोजी अमेरिकन लष्कराने पाकिस्तानातील अबोटाबाद येथे ओसामा बिन लादेनला कंठस्नान घातले होते.




त्याच्या पश्चात त्याच्या तीन पत्नी होत्या. हामजा हा त्यातील खैरिया साबर नावाच्या पत्नीपासून झालेला पूत्र आहे. ती ओसामाबरोबर अबोटाबादमध्ये राहात होती. गेली दोन वर्षे पाश्चिमात्य तपास संघटना हामजाचा शोध घेत आहेत. बिन लादेनचा आणखी एक मुलगा खालिदचाही अबोटाबाद येथील अमेरिकेने टाकलेल्या छाप्यात मृत्यू झाला होता. तर त्याचा तिसरा मुलगा साद याला 2009 साली अफगाणिस्तानात ड्रोनहल्ल्यात मारले गेले.

Web Title: Bin Laden's Son Marries 9/11 Hijacker's Daughter, Says Family