मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 02:32 IST2025-07-05T02:31:48+5:302025-07-05T02:32:18+5:30

संबंधित रिपोर्टनुसार, एका स्टिल्थ बॉम्बर विमानाचे हवाईमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते.

Big claim Where did the US B-2 bomber plane disappear after the attack on Iran One made an emergency landing and... | मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...

मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...

इराणच्या अनुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर, अमेरिकने आपली सर्व बी-2 स्टील्थ बॉम्बर विमाने परतल्याचा दावा केला होता. मात्र आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यानुसार, अमेरिकेने दोन ग्रुपमध्ये बी-2 बॉम्बर विमाने रवाना केली होती. यांपैकी एका ग्रुपचे विमान अद्यापपर्यंत मिसौरी एअरबेसवर पोहोचलेले नाही. मिसौरी येथील व्हाइटमन एअरफोर्स बेसवरून अमेरिकेने दोन समूहांत विमाने रवाना केली होती. 

यांपैकी एका ताफ्याने पॅसिफिककडून पश्चिमेकडे उड्डाण केले होते. या गटाचे काम हल्ला करणे नव्हे तर केवळ इराणी सैन्याची दिशाभूल करणे असे होते. तर सात बी-२ विमानांच्या दुसऱ्या ताफ्याने पूर्वेकडे उड्डाण केले आणि याच गटाने इराणवर हल्ला केला. हल्ला करणारा ताफा ३७ तासांनंतर मिसूरी एअरबेसवर परतला. मात्र, दुसऱ्या ताफ्यातील विमानांच्या परतण्याची पुष्टी होऊ शकली नाही.

एका बी-2 बॉम्बरची इमर्जन्सी लँडिंग -
संबंधित रिपोर्टनुसार, एका स्टिल्थ बॉम्बर विमानाचे हवाईमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. ते होनोलुलुमधील हिकम एअर फोर्स बेसजवळील डॅनियल के इनौये आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते. मात्र, हे विमान कोणत्या स्थितीत आहे, हे समजू शकले नव्हते. एवढेच नाही तर, विमानाचे आपत्कालीन लँडिंग का करण्यात आले? हे देखील सांगण्यात आले नाही.

अमेरिकेच्या या विशेष विमानाचे यापूर्वीही हवाईमध्ये आपत्कालीन लँडिंग झालेले आहे. 2022 मध्ये विमानाचा संपूर्ण ताफाच या विमानतळावर उतरला होता. 
2021 मध्ये अशाच एका घटनेनंतर, एक बी 2 बॉम्बर विमान रिपेयरिंगसाठी कॅलिफोर्निया येथे नेण्यात आले होते. संबंधित रिपोर्टनुसार, अमेरिकेचे बी2 बॉम्बर विमान अद्यापही होनोलुलूमध्येच अडकलेले आहे. तत्पूर्वी, इराणने अमेरिकेचे एक विमान पाडल्याचा दावा एका इराणी सोशल मीडिया हँडलवर करण्यात आला होता. मात्र, अमेरिकेने हा दावा फेटाळला होता.

Web Title: Big claim Where did the US B-2 bomber plane disappear after the attack on Iran One made an emergency landing and...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.