शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

अमेरिकेत बायडेन-कमला पर्व; जो बायडेन अध्यक्षपदी, कमला हॅरिस पहिल्या महिला उपाध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 12:49 AM

दुपारी १२च्या ठोक्याला अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी बायडेन यांना पदाची शपथ दिली. या वेळी बायडेन यांनी १२७ वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या कौटुंबिक बायबलची प्रत हातात घेतली होती.

वॉशिंग्टन : कोरोनामुळे मरगळलेली अर्थव्यवस्था... कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे वाढत चाललेली मृतांची संख्या... कॅपिटॉल हिलवर अलीकडेच झालेला हल्ला... अशी चारही बाजूंनी निराशाजनक परिस्थिती असताना व्हाइट हाउसच्या प्रांगणात नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या ४६व्या अध्यक्षपदाची तर कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. या वेळी असंख्य मान्यवर उपस्थित होते. मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र या सोहळ्याला पाठ दाखवली. मात्र, मावळते उपाध्यक्ष माइक पेन्स या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. दुपारी १२च्या ठोक्याला अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी बायडेन यांना पदाची शपथ दिली. या वेळी बायडेन यांनी १२७ वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या कौटुंबिक बायबलची प्रत हातात घेतली होती. २५ हजार सुरक्षारक्षकांच्या गराड्यात शपथविधी सोहळा झाला. कॅपिटॉल हिलवर अलीकडे झालेल्या हल्ल्याची काळी किनार सोहळ्याला होती. ७८ वर्षीय बायडेन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत वयोवृद्ध अध्यक्ष ठरले आहेत. तर कमला हॅरिस या प्रथम महिला उपाध्यक्ष ठरल्या आहेत. शपथविधी सोहळ्याला सुरुवात होण्यापूर्वी बायडेन यांनी वॉशिंग्टनमधील सेंट मॅथ्यूज कॅथेड्रल चर्चमधील सामूहिक प्रार्थनेला उपस्थिती लावली. या वेळी डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते. त्यानंतर सर्व जण व्हाइट हाउसच्या प्रांगणात शपथविधी सोहळ्यासाठी रवाना झाले.

बायडेन  यांनी ४६वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ -कॅपिटॉल हिल परिसर बायडेन यांच्या घाेषाने दणाणला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जाॅर्ज बुश, बिल क्लिंटन, बराक ओबामांची उपस्थिती पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी द्विटरद्वारे दिल्या बायडेन यांना शुभेच्छा. 

ट्रम्प म्हणाले, ‘मी पुन्हा येईन!’ - व्हाइट हाउसमधून अखेरच्या दिवशी बाहेर पडताना डोनाल्ड ट्रम्प भावुक झाले. ते म्हणाले, राष्ट्राध्यक्ष म्हणून देशाची सेवा करणे हा सर्वोत्तम गौरव आहे. व्हाइट हाउसकडे पाहात ट्रम्प म्हणाले, सध्या या वास्तूला गुडबाय करतोय. पण, हा कायमचा नसेल. मी पुन्हा येईन. पुन्हा भेट होईल. 

 

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनKamala Harrisकमला हॅरिसAmericaअमेरिकाUSअमेरिकाPresidentराष्ट्राध्यक्ष