बेंजामिन नेतन्याहू यांचा इराणच्या हल्ल्यात मृत्यू? सहा बोटांचा हात व्हायरल..., इस्रायलने दिले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 12:34 IST2026-03-15T12:33:38+5:302026-03-15T12:34:37+5:30

Benjamin Netanyahu Death Rumors: बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या अफवांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. सहा बोटांचा AI व्हिडिओ आणि कँडेस ओवेन्स यांची पोस्ट. वाचा सविस्तर.

Benjamin Netanyahu Death Rumors: Benjamin Netanyahu died in an Iranian attack? Six-fingered hand goes viral..., Israel gives explanation | बेंजामिन नेतन्याहू यांचा इराणच्या हल्ल्यात मृत्यू? सहा बोटांचा हात व्हायरल..., इस्रायलने दिले स्पष्टीकरण

बेंजामिन नेतन्याहू यांचा इराणच्या हल्ल्यात मृत्यू? सहा बोटांचा हात व्हायरल..., इस्रायलने दिले स्पष्टीकरण

तेल अवीव: मध्य आशियातील युद्धाच्या धगधगत्या वातावरणात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूची वावटळ सोशल मीडियावर उठली आहे. मात्र, इस्रायल सरकारने या सर्व बातम्यांना 'फेक न्यूज' ठरवत नेतन्याहू पूर्णपणे सुरक्षित आणि ठणठणीत असल्याचे स्पष्ट केले आहे. एका कथित एआय जनरेटेड व्हिडिओमुळे या अफवांना ऊत आला होता.

शुक्रवारी नेतन्याहू यांच्या अधिकृत 'X' अकाऊंटवरून एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता, ज्यामध्ये ते पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिसत होते. मात्र, काही चोखंदळ युजर्सनी दावा केला की, व्हिडिओमध्ये नेतन्याहू यांनी जेव्हा हात वर केला, तेव्हा त्यांच्या एका हाताला सहा बोटे दिसत होती. एआय तंत्रज्ञानाद्वारे बनवलेल्या फोटोंमध्ये अनेकदा बोटांची संख्या चुकते, हाच आधार घेत नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ बनावट असून नेतन्याहू यांची हत्या झाल्याच्या वावड्या उठवल्या.

अमेरिकन समालोचकाच्या पोस्टने तणाव वाढला
प्रसिद्ध अमेरिकन समालोचक कँडेस ओवेन्स यांनी "बिबी (नेतन्याहू यांचे टोपणनाव) कुठे आहेत?" असा सवाल करत या आगीत तेल ओतले. "त्यांचे कार्यालय बनावट एआय व्हिडिओ का शेअर करत आहे आणि व्हाईट हाऊसमध्ये इतकी घबराट का आहे?" अशा प्रश्नांमुळे अफवांना अधिकच बळ मिळाले.

इस्रायल सरकारचे चोख प्रत्युत्तर
पंतप्रधान कार्यालयाने या सर्व अफवांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. "आमचे पंतप्रधान पूर्णपणे स्वस्थ असून ते देशाचे नेतृत्व करत आहेत. शत्रू राष्ट्रांकडून किंवा खोडसाळ प्रवृत्तींकडून अफवा पसरवून अस्थिरता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे," असे सरकारने म्हटले आहे.

Web Title : ईरान के हमले के बाद नेतन्याहू की मौत की अफवाहें झूठी साबित हुईं, AI वीडियो सामने आया।

Web Summary : नेतन्याहू की मौत की अफवाहें एक कथित एआई-जनित वीडियो के बाद फैलीं जिसमें छह उंगलियां दिखाई गईं। इजराइल ने दावों का खंडन किया, पुष्टि की कि वह सुरक्षित हैं और देश का नेतृत्व कर रहे हैं, और दुष्प्रचार प्रयासों को खारिज कर दिया।

Web Title : Netanyahu death rumors debunked after Iran attack claims, AI video surfaces.

Web Summary : Rumors of Netanyahu's death spread after a purported AI-generated video showed six fingers. Israel refuted claims, confirming he is safe and leading the country, dismissing disinformation attempts.