"सावध राहा...! अन्यथा स्वतःच संपून जाल"; इराणची डोनाल्ड ट्रम्प यांना खुली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 17:44 IST2026-03-10T17:43:29+5:302026-03-10T17:44:43+5:30

या युद्धामुळे खाडी देशांत प्रचंड तणावाचे वातावरण आहे. अमेरिकेने हल्ले सुरूच ठेवल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे इराणने स्पष्ट केले आहे.

Be careful Otherwise you will end up on your own Iran's open threat to Donald Trump | "सावध राहा...! अन्यथा स्वतःच संपून जाल"; इराणची डोनाल्ड ट्रम्प यांना खुली धमकी

"सावध राहा...! अन्यथा स्वतःच संपून जाल"; इराणची डोनाल्ड ट्रम्प यांना खुली धमकी


इराण आणि अमेरिका यांच्यात लष्करी संघर्षासोबतच आता शाब्दिक हल्लेही सुरू झाले आहेत. इराणच्या एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांना थेट धमकी दिली आहे. 'एपी' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, "ट्रम्प यांनी सावध राहावे, अन्यथा ते स्वतःच संपून जातील," अशी धमकी संबंधित इराणी अधिकाऱ्याने दिली आहे. या युद्धामुळे खाडी देशांत प्रचंड तणावाचे वातावरण आहे. अमेरिकेने हल्ले सुरूच ठेवल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे इराणने स्पष्ट केले आहे.

ट्रम्प यांचा इशारा अन् इराणचं प्रत्युत्तर -
डोनल्ड ट्रम्प यांनी सोमवारी इराणविरुद्धचे युद्ध अल्पकाळासाठी असू शकते, असे विधान केले होते. मात्र, इराणने जागतिक तेल पुरवठ्यात अडथळा आणल्यास ही लढाई अधिक तीव्र होईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. "होर्मुझ सामुद्रधुनीतील तेल पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केल्यास, अमेरिका आताच्या तुलनेत वीस पट अधिक तीव्र हल्ला करेल," असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून म्हटले होते.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेसोबतच्या चर्चेचा अनुभव 'कटू' असल्याचे सांगत नवीन मुत्सद्दी चर्चेची शक्यता फेटाळून लावली आहे. अराघची यांच्या मते, इराणने गेल्या वर्षी चांगल्या हेतूने चर्चा सुरू केली होती, पण त्याच काळात आपल्यावर हल्ले झाले. "अमेरिकेने दिलेला शांततापूर्ण तोडग्याचा शब्द पाळला नाही, उलट परिस्थिती अधिक बिघडली," असा आरोप त्यांनी केला आहे.

आत्मरक्षणाचा अधिकार:
अराघची यांनी आखाती देशांना संदेश देताना स्पष्ट केले की, अमेरिकन तळांवर केलेले हल्ले हे आत्मरक्षणाच्या अधिकाराखाली आहेत. "हे युद्ध आमच्यावर लादले गेले आहे," असे सांगत, गरज पडल्यास क्षेपणास्त्र हल्ले सुरूच ठेऊ असा इशाही त्यांनी यावेळी दिला.
 

Web Title : ईरान की ट्रंप को चेतावनी: 'सावधान रहें, वरना मिट जाएंगे'

Web Summary : ईरान ने बढ़ते तनाव के बीच सीधे ट्रंप को धमकी दी। ईरान ने अमेरिका के हमलों के जारी रहने पर गंभीर परिणाम की चेतावनी दी। ट्रंप ने एक छोटे युद्ध का संकेत दिया, लेकिन ईरान द्वारा तेल आपूर्ति बाधित करने पर कड़ी प्रतिक्रिया की धमकी दी। ईरान ने अमेरिका के साथ आगे की बातचीत को खारिज कर दिया, अतीत की विफलताओं का हवाला दिया।

Web Title : Iran Warns Trump: 'Be Careful, or You Will Perish'

Web Summary : Iran directly threatened Trump amidst escalating tensions. Iran warned of severe consequences if US attacks continue. Trump hinted at a short war, but threatened a stronger response if Iran disrupts oil supply. Iran dismissed further talks with the US, citing past failures.