शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

चीनमध्ये वन्य प्राण्यांच्या व्यापारावर बंदी; कोरोना बळींची संख्या ५६, आजाराच्या विळख्यात १७ शहरे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 5:25 AM

चीनच्या कृषी मंत्रालय, व्यापार नियमन प्रशासन आणि राष्ट्रीय वन आणि वन्यभूमी प्रशासनाने ही बंदी आणली.

बीजिंग : चीनमध्येकोरोना विषाणूंमुळे राष्टÑीय पातळीवर पसरलेल्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने वन्यप्राण्यांच्या व्यापारावर तात्पुरती बंदी आणली आहे. चीनमध्ये अन्न म्हणून वन्य प्राण्यांच्या मांसाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कोरोना विषाणूंवर नियंत्रण मिळविण्यात येईपर्यंत सर्व वन्यप्राण्यांची विक्री आणि वाहतुकीवर बंदी राहणार असल्याचे सरकारने एका आदेशात म्हटले आहे.चीनच्या कृषी मंत्रालय, व्यापार नियमन प्रशासन आणि राष्ट्रीय वन आणि वन्यभूमी प्रशासनाने ही बंदी आणली. दरम्यान कोरोना विषाणूंमुळे पसरलेल्या आजाराने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५६ झाली आहे. १९७५ जणांना या आजाराची लागण झाली असून त्यापैकी ३२४ जणांची प्रकृती गंभीर आहे. हा नव्या प्रकारचा न्यूमोनिया गणला जात असून २०१९ -एनसीओव्ही असे त्याचे नाव असल्याचे राष्टÑीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे. चीनमध्ये आतापर्यंत २६८४ संशयित रुग्णांची नोंद झाली असून हुबेई प्रांतातील वुहान आणि अन्य १७ शहरांमध्ये या आजाराचे केंद्र आहे. बीजिंगसह विविध शहरांमध्ये हळहळू हा विषाणूजन्य आजार पसरत आहे.२५ जानेवारीपर्यंत हुबेई प्रांतात १०५२ रुग्णांची नोंद झाली होती. त्यापैकी १२९ जणांची प्रकृती गंभीर आहे. चीनचे सर्वात मोठे शहर असलेले शांघायमध्ये ४० रुग्णांची नोंद झाली आहे. (वृत्तसंस्था)स्थिती गंभीरच-जिनपिंगदेशात कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली स्थिती गंभीर असल्याची कबुली अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिली आहे. या विषाणूमुळे पसरलेल्या आजाराविरुद्ध सुरू असलेली लढाई आम्ही जिंकूच, असेही ते ठामपणे म्हणाले. दरम्यान चीनमध्ये या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी युद्ध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. वुहानमध्ये येत्या १५ दिवसामध्ये तात्पुरते १३०० बेडचे रुग्णालय उभारण्यात येत आहे. सध्या १ हजार बेडचे हॉस्पिटल उभारले जात असून त्याचे काम दहा दिवसात पूर्ण होईल.अमेरिकेतही लागणकोरोना विषाणूची लागण हळूहळू जगभरात होत आहे. हाँगकाँग, मकाऊ,तैवान, नेपाळ, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, थायलंड, व्हिएतनामसह अमेरिकेत रुग्ण आढळले असून शुक्रवारी जपानमध्ये रुग्णाची नोंद झाल्याने खळबळ उडाली आहे. सर्दी- पडसे होऊन या आजाराची लागण होते. सिव्हियर अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोममुळे (सार्स) रुग्ण दगावतो. कॅनाडामधील एका रुग्णालयात कोरोना विषाणूची लागण झालेला रुग्ण दाखल झाला असून त्याबाबत अधिकृतरीत्या दुजोरा देण्यात आला आहे.भारतीयांच्या आरोग्याबाबत निगराणी- जयशंकरनवी दिल्ली : बीजिंगमधील भारतीय दूतावास भारतीयांच्या आरोग्याबाबत सातत्याने निगराणी ठेवून असल्याचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी नमूद केले. चीनने भारतीय दूतावासात हेल्पलाईन सुरू केली असून भारतीय नागरिकांना सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे, असे ते म्हणाले. दरम्यान भारतीय दूतावासाने केलेले टिष्ट्वट रिटिष्ट्वट करीत जयशंकर यांनी उपाययोजनांची माहिती दिली.

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना