नमाजावेळी मशिदीवरील लाऊडस्पीकरला बंदी; सौदी अरेबियानं जारी केल्या गाईडलाईन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 10:01 AM2023-03-13T10:01:45+5:302023-03-13T10:05:41+5:30

देशावरील तेल अर्थव्यवस्थेचा टॅग हटवण्यासाठी ते पर्यटकांना आकर्षित करण्याची तयारी करत आहे.

Ban on mosque loudspeakers during prayers; Read the guidelines issued by Saudi Arabia | नमाजावेळी मशिदीवरील लाऊडस्पीकरला बंदी; सौदी अरेबियानं जारी केल्या गाईडलाईन्स

नमाजावेळी मशिदीवरील लाऊडस्पीकरला बंदी; सौदी अरेबियानं जारी केल्या गाईडलाईन्स

googlenewsNext

नवी दिल्ली - महाराष्ट्रासह अनेक राज्यात मशिदीवरील भोंग्याचा विषय कायम चर्चेत असतो. गेल्या वर्षी हा मुद्दा प्रामुख्याने गाजला. देशभरातील मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढावे यासाठी हिंदू संघटनांनी आंदोलन घेतले. भारतात या मुद्द्यावरून राजकीय वादंग पेटले असताना दुसरीकडे मुस्लीम बहुल देश सौदी अरेबियात नमाज पठणावेळी लाऊडस्पीकरवर बंदी आणली आहे. रमजान महिन्यासाठी तेथील सरकारने गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. 

रमजान महिना २३ मार्चपासून सुरू होणार आहे. रमजानच्या आधी सौदी अरेबिया सरकारच्या इस्लामिक मिनिस्ट्रीने एक गाईडलाईन्स जारी केली आहे. त्यात रमजानवेळी लाऊडस्पीकरमधून नमाज पठण आणि मशिदीत इफ्तार पार्टीवर बंदी आणली आहे. सौदी अरब सरकारने याबाबत १० मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यात रमजानवेळी देणगी मागायलाही बंदी घातली आहे. 

नव्या निर्देशांमध्ये काय आहे?

  • नमाज पठणावेळी लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही. 
  • रमजानवेळी देणगी, वर्गणी मागण्यास मनाई
  • रमजानसाठी दावत मशिदीच्या आत नको. बाहेरच्या परिसरात दावत दिली जाऊ शकते. या दावताचे नियोजन सुपरव्हिजन इमामांच्या हातात असेल. 
  • रमजानच्या पूर्ण महिन्यात मशिदीत इमाम उपस्थित राहतील. अत्यावश्यक असेल तर ते सुट्टी घेऊ शकतात. 
  • इमाम नमाज वेळेवर संपवतील. जेणेकरून दुसऱ्यांना योग्य वेळ मिळू शकेल.
  • मशिदीत लहान मुलांना नमाज पठण करण्यावर बंदी
  • इतीकाफच्या महिन्यात म्हणजेच रमजानमध्ये मशिदीमध्ये जगापासून अलिप्त राहण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल.

 

रमजानमध्ये संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार

जगातील अनेक इस्लामिक संघटनांनी सौदीने रमजानसाठी जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांवर नाराजी व्यक्त केली आहे. दैनंदिन जीवनात इस्लामचा प्रभाव कमी करण्यासाठी हे करण्यात आले आहे असा आरोप संघटनांनी केला. सौदीचे राजकुमार सलमान परदेशी लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असल्याचं टीकाकारांचं मत आहे. रमजानमध्ये विविध संगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांच्यावर बंदी घालावी किंवा कोणताही परिणाम व्हावा असं प्रिन्सला वाटत नाही.

तर एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत इस्लामिक मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल्ला अल-अनेजी म्हणाले की,  मंत्रालय मशिदींमध्ये इफ्तार पार्ट्यांवर बंदी घालत नाही, परंतु त्यांचे आयोजन व्यवस्थित करत आहेत. जेणेकरून एक जबाबदार व्यक्ती त्याचे आयोजन करेल. यामुळे मशिदीचे पावित्र्य आणि स्वच्छता राखण्यात मदत होईल. सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान (MBS) यांनी त्यांच्या व्हिजन-2030 अंतर्गत बदलासाठी अनेक पावले उचलली आहेत. सौदीचे तेलावरील अवलंबित्व कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. देशावरील तेल अर्थव्यवस्थेचा टॅग हटवण्यासाठी ते पर्यटकांना आकर्षित करण्याची तयारी करत आहे. रमजानसाठी जारी करण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वे क्राऊन प्रिन्सच्या व्हिजन-2030 शी देखील जोडली जात आहेत.
 

Web Title: Ban on mosque loudspeakers during prayers; Read the guidelines issued by Saudi Arabia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.